![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
रामटेक तालुका प्रतिनिधी :- सुरेंद्र बिरनवार
रामटेक :- संभाजीनगर येथे महाराष्ट्राचा अभिमान उद्योजकाचा सन्मान सदर कार्यक्रम माऊली ग्रुप ऑफ इंडस्ट्रीतर्फे १२ फेब्रुवारीला घेण्यात आलेला होता. सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे केंद्रीय अर्थमंत्री डॉक्टर भागवत कराड तसेच चित्रपट कलावंत वर्षा उसगांवकर, मराठी चित्रपट कलाकार स्पृहा जोशी व्यासपीठावर विराजमान होते.
प्रल्हाद किंमतकर यांच्या परिवाराला महाराष्ट्र उद्योजक परिवार २०२४ सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. उद्योजक पुरस्कार भेटल्याबद्दल किंमतकर परिवारांचे अभिनंदन पर्यटक मित्र चंद्रपालजी चौकसे, माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, भारतीय प्रगतिशील पत्रकार संघाचे अध्यक्ष नथुजी रामेलवार, उपाध्यक्ष कार्तिक उराडे, संघाचे सदस्य रामानंद अडामे, रामटेक येथील समाजसेवक नागेश राव वाघमारे, अविनाश भोगे, श्याम भादुले, गणेश बुराडे, संकेत निंबेकर, अश्विनी ठाकूर, एमटीडीसी रामटेक चे उद्योजक प्रशांत किंमतकर, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे सचिव तथा राष्ट्रीय आदर्श विद्यालय शिक्षण मंडळ रामटेक चे सचिव मयंक देशमुख, अंशुल देशमुख, अनिल मुलमुले, वनमाला चौरागडे, माजी नगराध्यक्ष नलिनी चौधरी, माजी नगराध्यक्ष शोभा राऊत, रामटेक नगर परिषदेचे माजी महेंद्र टक्कामोरे, इत्यादींनी त्यांचे पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केले.