



रामटेक तालुका प्रतिनिधी :- सुरेंद्र बिरनवार
रामटेक :- रामटेक आगारातील हिवरा बाजार मार्गे जाणारी बेलदा बसने श्री. रमेश बकाराम पानसे मु. पिंडकापार (सोन.) वय अंदाजे 60 वर्ष यांचा एसटी बसवर चढत असताना तोल जाऊन खाली पडले व बसचा चाकाचा खाली येऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना सकाळी 11.00 वाजताचा सुमारास घडली असून प्राप्त माहितीनुसार रस्त्याचे काम सुरु असताना सुद्धा बस चालक सुसाट वेगाने बस चालवितात अशी माहिती पिंडकापार (सोन.) चा पोलीस पाटील इंदिरा पानसे यांनी दिली. रामटेक आगाराची बस पोलीस स्टेशन रामटेक येथे तब्यात घेतलेली आहे. पुढील तपास रामटेक पोलीस करीत आहे.