![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
रामटेक तालुका प्रतिनिधी :- सुरेंद्र बिरणवार
रामटेक :- मनसर गावाला आपली एक वेगळी ओळख देणारे, संपूर्ण जगभरात प्रसिद्ध असलेले रामधाम पर्यटक मित्र श्री. चंद्रपालजी चौकसे यांच्या संकल्पनेतून 2004 साली याची स्थापना करण्यात आली. रामधाम येथे जगातील सर्वात मोठ्या ओमची निर्मिती केलेली आहे याची लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सुद्धा नोंद आहे. रामधामला भेट दिल्यानंतर भाविकांना एकाच ठिकाणी बाबा अमरनाथ, बारा ज्योतिर्लिंग, अष्टविनायक गणेश, माता वैष्णोदेवीच्याा दर्शनासह, भगवान श्रीराम, भगवान श्रीकृष्णाच्या जीवन चरित्रावर आधारित चित्रप्रदर्शनाच्या लाभ घेता येतो यासोबतच भाविकांना शिव बारात, श्रीकृष्णाचे गौप्रेम, गोवर्धन पर्वत, विष्णू लोक विराट दर्शन घेता येतात येथील सुवि बर्डपार्क मध्ये देश विदेशातील विविध प्रजातींचे पक्षी यासह लंडन बस, ट्रेन, अमुजमेंट पार्क, ऍग्रो पार्क बघण्यास मिळतात.
रामधाम च्याच एक भाग बनवून 2021 साली रामधामचे संस्थापक श्री. चंद्रपाल चौकसे लाईट हाऊस वॉटरपार्क ची निर्मिती केलेली आहे यात लहान-मोठे असे सहा पूल व पंधरा स्लाईड्स आहे. याच स्लाईड मधील एक सुपर कर्ल जी संपूर्ण विदर्भात फक्त लाईट हाऊस वॉटरपार्क मध्येच आपणास बघण्यास मिळते. थंडर्स कृस, स्पायरल स्लाईड, अशा वेगवेगळ्या स्लाईडस इथे आहेत. यासह डी.जे. साउंड वर रेन डान्स, वेव पुल, आकर्षक वॉटरफॉल यासह मिनी मिल सुद्धा देण्यात येते येथे आल्यावर एक वेगळाच आनंद होतो, या स्थळाला दररोज हजारो पर्यटक भेट देतात आपण सुद्धा आपल्या परिवारासह, मित्र मंडळीसह अवश्य यावे.