![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
नागपुर प्रतिनिधि/ मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ येथे प्रलंबित दुसरे अपिल क्रमांक ५६८/२०१७ मध्ये मा. न्यायालयाने नागपुर सुधार प्रन्यास कायदा १९३६ चे कलम ११५ अंतर्गत नोटीस न देता दावा दाखल केला जावू शकतो काय आणि नागपूर सुधार प्रन्यास अधिकाऱ्यांनी अनधिकृत बांधकाम काढण्यासाठी दिलेली नोटीस नागपूर सुधार प्रन्यास च्या अधिकारांच्या कार्यक्षेत्रात येते काय असे दोन प्रश्न निर्मित करून मोठे खंडपीठा समोर विवेचन व निर्णय देण्यासाठी पाठविण्याचे आदेश दिनांक २६/०२/२०२४ रोजी न्यायमुर्ती अनिल एल.पानसरे आदेश दिले आहे. असे करतांना यापुर्वी बांधकाम, रिपेरींग इत्यादी वगैरे करण्यास स्थगिती दि. १०/११/२०२३ ला हायकोर्टाचे न्यायमुर्ती श्रीमती एम.एस. जावळेकर यांनी दिली होती. ती पुढील आदेशापर्यंत स्थगिती दि.२६/०२/२०२४ रोजी न्यायमुर्ती श्री.अनिल एल. पानसरे यांनी Iterim relief granted earlier to continue until further orders असा आदेश कायम दिला आहे. जैन कलार समाज भवनाची जागा विद्यार्थ्यांच्या नावाने खसरा नं. ५४७, नगर भुमापन क्र. ३१३, १०७, मौजा- नागपूर रेशिमबाग उमरेड रोड, नागपूर एकर ४३६८७.५० चौ. फुट जागा विद्यार्थ्यांच्या वस्ती गृहासाठी दि. १८/०७/१९६१ ला देण्यात आली होती. परंतू येथे वस्तीगृह नामधारी असून फक्त ६ विद्यार्थी आहे. व फोटोत दिसल्याप्रमाणे कोणतेही उपक्रम सुरू नाही. उलट मोठ्या प्रमाणात जैन कलार समाज भवनात मंगल कार्यालय व लॉन चे बुकींग मोठया प्रमाणात घेत आहे. व व्यावसायिक व्यापारोउपयोग करीत आहे.
हि बाब एनआयटी च्या लक्षात आल्यावर दि. २८/११/२०१६ ला नोटीस बजावण्यात आली होती. व रू. ५२,३९,०७०/- दंड व व्याज भरण्याचे आदेश झाले होते. व यापुढे दि. ३१/१२/२०१६ नंतर उपरोक्त भुखंडावर व्यापारोउपयोग करतायेणार नाही असे लेखी नोटीस सचिव जैन कलार समाज, उमरेड रोड, नागपूर यांना ताकीद दिली होती. परंतू ७ वर्षापासून नियमाची पायमल्ली करून जवळपास ७-८ करोड रूपये समस्त नागरीकांकडून वसूल केले. ती एक प्रकारची धोखाधडी व विश्वासघात आहे. व त्यामुळे आय.पी.सी. कलम ४२०, ४०६ अंतर्गत फौजदारी गुन्हा संबंधीत पदाधिकाऱ्यावर दाखल करण्याची मागणी करण्यात आली. हा भुखंड रद्द झाला आहे. तो पूर्ववत झाला नाही. लिज रिन्यूव्हल दि. ३१/०३/२०२१ पर्यंत होती. परंतू ३५ महिने झाले तरी नागपूर सुधार प्रन्यासची लिज रिन्यूव्हल केली नाही. ३. नागपूर सुधार प्रन्यास चे जवळपास रू. ६६,४३,०३५/- झाले आहे. ते सुध्दा अद्याप पावेतो भरले नाही. जैन कलार समाज भवन व हॉल बुकींग करतांना नागरीकांनी व समस्त समाज बांधवांनी विचारपूर्वक निर्णय घ्यावा. जैन कलार समाज भवन व हॉल बुकींग लग्नासाठी स्वागतसमारंभासाठी करतांना जनतेने व समस्त समाज बांधवांनी सावाधगिरी बाळगा अन्यथा पश्चातापाची वेळ येईल ज्यांनी बुकींग केली त्यानी पैसे परत घेवून दुसरीकडे सोय करावी. व भविष्यातील अनर्थ टाळावा कारण भूखंड रद्द झाला आहे. ३५ महिने झाले लिज रिनिव्हल केले नाही. रू. ६६,४३,०३५/- दंड व व्याज भरले नाही. त्यामुळे कायदेशीर भुखंडावर मंडळाचा अधिकार नाही व बुकींग करण्याचा अधिकार नाही. तसेच कोर्टाने किंवा नागपूर सुधार प्रन्यास ने व्यावसायिक उपयोगाला परवानगी दिली नाही हि बाब हायकोर्टाच्या लक्षात आली. व त्यामुळे कायदेशीर कारवाई होवून केव्हाही भवनाला सील लागू शकतो ही शक्यता नाकारता येत नाही. हायकोर्टात नागपूर सुधार प्रन्यास तर्फे अधिवक्ता ए.सी.धर्माधिकारी व आर.पी.जोग यांनी बाजू मांडली जैन कलार समाज न्यास तर्फे वरिष्ठ अधिवक्ता सुनिल मनोहर व इंटरव्हेनर भूषण दडवे तर्फे वरिष्ठ अधिवक्ता पी.के.मिश्रा व अमित मिश्रा यांनी काम पाहिले.