![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
तुमसर/ प्रतिनिधि
गोंदिया शिक्षण संस्था द्वारा संचालित एस. एन. मोर महाविद्यालयात तुमसर येथे ग्रंथालय विभाग आणि ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमानाने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सी. बी. मसराम तर कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शन कुबेर तुमसर चे जे.सी. मा.श्री.गौरव नवरखेले हे उपस्थित होते.संचालन लता खंडाईत यांनी केले, तर प्रास्ताविक प्रा. सुनील कान्होलकर सर यांनी केले. या याप्रसंगी प्राचार्य डॉ.सी.बी.मसराम यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत एकाग्रतेचे महत्त्व पटवून सांगितले. व कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक असलेले जे.सी.गौरव नवरखेले यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी व विविध स्पर्धा परीक्षा असणाऱ्या पदाची व त्यांच्या परीक्षा पद्धतीची माहिती दिली. याप्रसंगी कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित प्रा. जांभुळे सर, प्रा.गायधने मॅडम, प्रा.बोपचे मॅडम, प्रा.रामटेके सर उपस्थित होते
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता ग्रंथालय विभागा मारुती तायवंडे, संजू आंबाडारे यांनी प्रयत्न केले. तसेच कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.