![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
रामटेक तालुका प्रतिनिधी :- सुरेंद्र बिरनवार
रामटेक:- संसार उध्वस्त करी दारू, दारूस स्पर्श नका करू….! असे शासनामार्फत नशापानी करू नका म्हणून सांगितले जाते मात्र तरीही शहरासह ग्रामीण भागात नशा-पाणी करण्याचे प्रमाण वायुवेगाने वाढत आहे. तरी काही वर्षांपूर्वी पंजाबचेही नशिमुळे हाल बेहाल झालेत. परिणामी गहू उत्पादनात अग्रेसर असलेले पंजाब राज्य चक्क व्यसन करण्यात आघाडीवर गेले. त्यावरूनच उडता पंजाब असेही या सुखी समृद्ध राज्याची दुसरी काळी बाजु असलेले चित्र समोर आले. असा प्रकार आपल्या भागात व्हायला नको. युवक – युवती हेच देशाचे खऱ्या अर्थाने आधारस्तंभ असतात ते सक्षम राहिले तरच देशाची प्रगती निश्चितपणे होत असते. पण युवा वर्ग भरकटला तर एवढ्या मोठ्या देशाची धुरा नेमकी द्यायची कुणाला ? असाही प्रश्न भविष्यात उद्भवू शकतो. म्हणूनच अशी दुर्देवी वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून “बेटा-बेटी बचाओ, नशा हटाओ” हे राष्ट्रीय अभियान राबविण्याचे संकल्प “बेटा-बेटी बचाओ, नशा हटाओ” समितीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रपाल चौकसे यांनी केले आहे. या अभियानाची सुरुवात डिसेंबर 2023 मध्ये सरपंच भवन पारशीवनी येथून माजी मंत्री सुनीलजी केदार यांचे हस्ते हिरवी झेंडी देऊन करण्यात आले होते तेव्हापासून दररोज तालुक्यातील गावा-गावात जाऊन जनजागृतीचे कार्य करीत आहेत. त्यांचा या अभियनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
“बेटा-बेटी बचाओ, नशा हटाओ” या राष्ट्रीय अभियानाचा मुख्य उद्देश नवीन पिढीला सुसंस्कृत बनविणे व त्यांना विविध व्यसनापासून दूर ठेवण्याची आहे. संस्कार देण्याची सुरुवात ही आपल्या घरापासून, आपल्या कुटुंबापासून, आपल्या समाजापासून व आपल्या शाळेपासून व्हायला पाहिजे असे मत “बेटा-बेटी बचाओ, नशा हटाओ” समितीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रपाल चौकसे यांनी केले आहे.