![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
रामटेक तालुका प्रतिनिधी :- सुरेंद्र बिरनवार
रामटेक :- पंचायत राज मंत्रालय भारत सरकार यांनी ग्रामपंचायत स्तरावर लोकसहभागाद्वारे ही शाश्वत विकास ध्येय स्थानिक नियोजनाच्या माध्यमातून साध्य करण्याच्या प्रयत्न केलेला आहे भारतातील बहुसंख्य लोकसंख्या हे गावांमध्ये राहत असल्याने ही शाश्वत विकासाची ध्येय साध्य करण्यासाठी त्यांचे स्थानिकरन करणे आवश्यक आहे स्थानिकरण हे स्थानिक आराखड्याच्या नियोजनातून करणे अपेक्षित आहे ही बाब ध्यानात घेऊन केंद्र व राज्य शासन पुरस्कृत राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान अंतर्गत जिल्हा परिषद नागपूर व ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत नगरधन येथील ग्रामसंवाद भवनात
तीन दिवसीय प्रशिक्षण नगरधनचा सरपंच सौ. मायाताई अरुण दमाहे, ग्रामविकास अधिकारी सौ. प्रतिभाताई गिरी, CRP सौ. सिमाताई बिरणवार याचे प्रमुख उपस्थित संपन्न झाले या प्रशिक्षणात 1) गरिबी मुक्त गाव 2) आरोग्यदायी गाव 3) बालस्नेही गाव 4) जलसमृद्ध गाव 5) स्वच्छ आणि हरित गाव 6) पायाभूत सुविधा युक्त गाव 7) सामाजिक न्याय आणि सामाजिक दृष्ट्या सुरक्षित गाव 8) सुशासन युक्त गाव 9) महिला स्नेही गाव अशा नऊ संकल्पनेचा आधारित प्रशिक्षण देण्यात आले व सर्व प्रशिक्षणार्थिना प्रमाणपत्र देण्यात आले. प्रशिक्षणात 60 महिलांनी प्रशिक्षण घेतले यात आंगणवाडी सेविका, आशा वर्कर, उमेद अभियानातिल महिला बचत गटातील महिला, ग्रामपंचायत नगरधनचा सर्व महिला सदस्या उपस्थित होत्या.