![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
तिरोडा प्रतिनिधि:- प्रादेशिक पर्यटन विकास निधी अंतर्गत तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांच्या माध्यमातून चोरखमारा पर्यटन क्षेत्र येथे २५०.०० लक्ष रुपये मंजूर करण्यात आले असून यामध्ये बघेले असोसिएट ग्रुपतर्फे डिसाइन करून उद्यान, रस्ते, स्वच्छतागृह, विजसुविधा, खेळाचे मैदान, सभागृह बांधकाम अशा विविध विकासकामांचे बांधकाम होणार असून सदर कामांचे भूमिपूजन आमदार महोदयांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले यावेळी प्रामुख्याने जी.प.सदस्या सौ.तुमेश्वरी बघेले, सौ.रजनीताई कुंभरे, कृउबास सभापती श्री जितेंद्र रहांगडाले, आर्किटेक्चर संदीप बघेले, प.स.सभापती सौ.कुंता पटले, प.स.सदस्य सौ.दिपाली टेंभेकर, कृउबास संचालक श्री मिलिंद कुंभरे, चोरखमारा सरपंचा सौ.कल्पना दहिकर, भजेपार सरपंच डॉ.शिशूपाल रहांगडाले, डॉ. तारेंद्र बिसेन सदस्य , वडेगाव सरपंच श्री शामराव बिसेन, व चोरखमारा शिव मंदिर कमिटीचे अध्यक्ष शोभेलाल दहीकर, सचिव मंगल बिसेन , तारेन्द्र बिसेन, ग्रा.प.सदस्य निरज असाटी, जगदीश टेंभरे, धरम बोपचे, उपस्थित होते.