
रामटेक तालुका प्रतिनिधी :- सुरेंद्र बिरणवार
रामटेक तालुक्यातील शिरपूर येथील हनुमान देवस्थान पंचकमिटी शिरपूर येथे संगीतमय श्री शिव महापुराण कथा व रुद्राक्ष ज्ञानयज्ञ कार्यक्रमात रामटेक विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस नेते मा.श्री. चंद्रपालजी चोकसे (अध्यक्ष राष्ट्रीय पंचायती राज ग्रामपंचायत सरपंच संघटन महाराष्ट्र राज्य/पर्यटक मित्र रामटेक) यांनी भेट दिली व श्री. चंद्रपाल चौकसे लोकसेवा प्रतिष्ठान रामधाम तर्फे ह.भ.प. येनिरामजी भट महाराज यांचे सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी आमदार श्री. डी. मल्लिकार्जुन रेड्डी, डॉ. राजेशजी ठाकरे, श्री. अमित बादुले (ग्रा.पं. सदस्य), सौ. सुषमाताई इनवाते (ग्रा.पं. सदस्या), श्री. दामोदरजी गाउत्रे (अध्यक्ष, हनुमान पंचकमेटी शिरपूर), श्री. गुलाबजी निकुरे (उपाध्यक्ष, हनुमान पंचकमेटी शिरपूर), श्री. रतनजी चांदेकर, श्री. गंगाधरजी गाउत्रे, श्री. नामदेवजी निकुरे, श्री. रामकृष्णाजी भोंदे, श्री. गजाननजी इडपाचे, श्री. भगवानजी ठाकरे, श्री. शामुजी चौधरी, श्री. किशोरजी मांदाळे व समस्त गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Total Users : 883092
Total views : 6488527
