![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
तिरोडा:- तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजनेतून बेरडीपार का.येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यात आले असून सदर वास्तूचे बांधकाम पूर्ण झाले असून आमदार महोदयांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले यामुळे परीसरातील नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्या सुटणार आहेत. यावेळी प्रामुख्याने जी.प.अध्यक्ष पंकज रहांगडाले,मुख्य कार्यकारी मुरुगानंथम , जी.प.सदस्य प्रवीण पटले, चत्रभूज बिसेन,प.स.सभापती कुंता पटले, उपसभापती हुपराज जमाईवार, प.स.सदस्य सुनंदा पटले, ज्योती शरणाग, सरपंच चेतना कोल्हटकर, उपसरपंच विद्याधर शरणागत , कृउबास संचालक जयप्रकाश गौतम, ग्रा.प.सदस्य तालुका आरोग्य अधिकारी सुबोध धोटे, गटविकास अधिकारी सतीश लिल्हारे व आरोग्य यंत्रणेचे कर्मचारी उपस्थित होते.