![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
तुमसर प्रतिनिधि/२८ मार्च २०२४ ला राजमुद्रा ग्रुप तुमसर तर्फे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे 394 वी जयंती छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला माल्याअर्पण करून साजरी करण्यात आली.
तुमसर येथे राजमुद्रा ग्रुप तर्फे दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेप्रमाणे तसेच तिथीप्रमाणे सुद्धा साजरी केली जाते परंतु यावर्षी आचारसंहिता असल्यामुळे तिथे प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती कृषी उत्पन्न बाजार समिती येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला माल्याअर्पण करून साजरी करण्यात आली यावेळी राजमुद्रा ग्रुपचे मीनल निमजे,पल्लवी निनावे, राजमुद्रा ग्रुप संस्थापक/अध्यक्ष इंजि.सागर गभने, सागर भुरे,शुभम बानासुरे,राहुल रणदिवे, स्वप्निल डुंबरे,सोनू हट्टेवार उपस्थित होते.