![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
तुमसर प्रतिनिधि/ पोस्ट ऑफिस तुमसर येथे पार्सल घेवून जाण्याकरिता आलेल्या ग्राहकाशी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अरेरावी करत मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या पोस्ट ऑफिस तुमसर मध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची ग्राहकांशी अरेरावी करणे ही काही नवीन बाब नाही. माञ आता या अरेरावी ने आता कळस गाठला असून ग्राहकांना मारण्या इतपत पोस्ट ऑफिस च्या अधिकारी कर्मचऱ्यांची मजल गेली असल्याने ग्राहकात रोष खदखदत आहे.
अनिल कारेमोरे नामक ग्राहक आपला पार्सल आणायला पोस्ट ऑफिस मध्ये गेले असता पोस्टमनने पैसे घेवुन पार्सल दिले. मात्र त्या पैशात 20 रूपयांची एक जुनी व थोडीशी फाटकी नोट होती. त्यामूळे पोस्टमन ने सर्वच नोटा जुन्या आहेत. नविन नोटा आणा व आपला पार्सल घेवून जा असे म्हणून पोस्टमन ने कारेमोरे यांच्या हातातून पार्सल हिसकावून घेतले. त्यावर कारेमोरे यांनी या नोटा चालत नाही असे लिहून द्या असे बोलले असता या पोस्टमन ने ग्राहकाला पोस्ट मास्टर कडे घेऊन गेले व पोस्ट मास्तर सोनकूसरे यांनी त्यावर तोडगा न काढता उलट या ग्राहकाशी असभ्य वागणूक देत शिवीगाळ करून मारहाण करण्याचा प्रयत्न केला तर तेथील एका शुक्ला नामक अधिकाऱ्याने शिवीगाळ करत तेरे को काट डालुंगा चीर डालुंगा अश्या प्रकारे दादागिरी केली या सर्व प्रकाराची पीडित ग्राहकाने मोबाईल वर व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न केला असता त्याचा मोबाईल सुद्धा हिसकावून घेतला .या संपूर्ण प्रकरणाची तक्रार अनिल कारेमोरे या ग्राहकाने मुख्यमंत्री,जिल्हाधिकारी,प्रवर अधिक्षक डाकघर नागपूर याना केली व विभागीय चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे.
या प्रकरणी संबंधित अधिकारी व तक्रार दाराचे स्टेटमेंट घेऊन त्याचा चौकशी अहवाल प्रवर अधीक्षक डाकघर नागपूर यांना कारवाई करिता पाठविण्यात येईल.
अजय अडंगे – उप डाक निरीक्षक विभाग तुमसर