![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
तुमसर प्रतिनिधि/
भारतातील शिवकालीन युद्ध कला सगळीकडे प्रसिद्ध आहे. स्वराज्य स्थापनेत छत्रपती शिवाजी महाराजांना महत्त्वाचे योगदान देणाऱ्या युद्ध कलेला मर्दानी खेळ म्हणून ओळखले जाते. भारताला युद्धकलेची मोठी परंपरा लाभली आहे. ही परंपरा टिकवण्यासाठी अनेक राज्यांत विविध प्रयत्न सुरू आहेत. शिवकालीन युद्धकला ही माणसाला परिपूर्ण बनविणारी कला आहे. यात दांडपट्टा, तलवारबाजी, लाठीकाठी अशा मर्दानी खेळाचा समावेश हाेताे.मैदानी खेळ म्हणजे असे खेळ जे मैदानावर खेळले जातात. यामधे संपूर्ण शरीराची हालचाल होते, शरीराचा व्यायाम होतो, व शरीर तंदुरुस्त राहते. मैदानी खेळ हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. काही खेळ हे एकट्याने खेळायचे असतात तर काही अनेक खेळाडू एकत्र येऊन खेळले जातात.
लाठी-काठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत असलेला हा एक प्राचीन मर्दानी खेळ. स्वसंरक्षण व शत्रूवर हल्ला करणे यातून लाठी फिरवण्याच्या कल्पनेचा उगम झाला. प्राचीन काळात बचाव व हल्ला यांसाठी सुरूवातीला झाडाच्या फांदीच्या वापर होत हाेता, दोन प्रतिस्पर्धी एकमेकाच्या शरीराला लाठीचा स्पर्श करून गुण मिळवतात. लाठी अंगाभोवती न थांबू देता गरगर फिरवून एकातून एक अशी वर्तुळे निर्माण करण्यात खरे कौशल्य असते.दांडपट्टा हे मध्ययुगीन भारतीय उपखंडातले तलवारीसारखे पात्याचे शस्त्र आहे. दांडपट्टा ही एक प्राणघातक तलवार होती, ज्यावर मराठा योद्धांचे नियंत्रण होते असे म्हटले जाते. मराठ्यांच्या प्रमुख शस्त्रांमध्येही त्याचा समावेश होता. अनुभवी योद्धे या घातक तलवारीवर नियंत्रण ठेवू शकतात.
“कुठे तुला लढायला जायचे, गप्प बस घरात’ पालकांचे हे वाक्य मुलांच्या सर्वांगीण विकासाला बाधा आणते. मात्र, पालकांनो लढायला जायचे नसले तरी स्व-रक्षणासाठी तरी मुला-मुलींना मैदानावर पाठवा. त्यांना मर्दानी खेळ खेळूद्या, शस्त्रास्त्रांची ओळख होवू द्या आपला इतिहास आत्मसात करूद्या, तरच आपली संस्कृती आणि संस्कार टिकतील. त्यासाठी “शिवकालीन कला, शस्त्रास्त्र, गडकिल्ले’ मोहीम हाती घ्यावी लागेल. आधुनिक तंत्रज्ञानात आपण पुरते गुरफटले गेल्याने मैदानी खेळ तर संपलेच. “खेळ उरला तो टीव्ही आणि मोबाइलच्या स्क्रीनवर’. त्यामुळे वेळीच मुलांना मैदानावर पाठविण्यासाठी पालकांनी लाड बाजूला ठेवून किमान स्व-रक्षणाचे धडे मिळतील, असा युवक तरी तयार होऊ दिला पाहिजे. त्यामध्ये मुले-मुली दोघांनाही संधी मिळावी, त्यासाठी शिवकालीन खेळ, शस्त्रास्त्र आणि गडकिल्ले यांची माहिती व प्रशिक्षण देणे अंत्यत आवश्यक असून, काळाजी गरज बनली आहे. “मन, मेंदू आणि मनगट यांच्यामध्ये साहस निर्माण करण्याचे असेल तर मुला-मुलींनी मैदानात उतरलेच पाहिजे. शिवकालीन शस्त्रास्त्र खेळाचे प्रशिक्षण आपल्या मुलांना नेहमीच स्व-रक्षणासाठी महत्वपूर्ण आहेत. त्यातून आपली संस्कृती आणि संस्कार टिकून राहतील.
दिनांक 27 एप्रिल ते 1 मे 2024 पर्यंत. वेळ : दुपारी 4.00 ते सायं. 6.00