![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
तुमसर प्रतिनिधि/ तुमसर येथील महाराष्ट्र लाईव्ह न्युज चे तालुका प्रतिनिधी पत्रकार अमृतलाल (लालू) चरडे यांची मिनिस्ट्री ऑफ कार्पोरेट अफेयर्स, भारत सरकार मान्यता प्राप्त, माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती च्या भंडारा जिल्हा सहसंघटक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती समितीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष महेश सारणीकर, कार्याध्यक्ष सखाराम कुलकर्णी, सचिव विनोद गायकवाड व संपर्कप्रमुख विकास गोरवाडकर यांनी केली. माहिती अधिकार व पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असताना येणाऱ्या अडीअडचणी सोडवत माहिती अधिकार व पत्रकारितेची चळवळ सक्षम आणि सशक्त करण्याचे कार्य ही समिती करीत असते. या नियुक्तीचे पत्रकार अमृतलाल (लालू) चरडे यांचे परिसरात जनसामान्यांकडून कौतुक होत आहे.