![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
तुमसर प्रतिनिधि/
अनिष्ट चालीरितींमध्ये गुरफटलेल्या समाजाला ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जाणारे, स्त्रीविरोधी मानसिकतेचा बिमोड करीत स्त्रीशिक्षणाचा पाया रचणारे, थोर समाजसुधारक, क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंती दिनानिमित्त आज जनसंपर्क कार्यालय मोहाडी येथे आमदार राजु माणिकरावजी कारेमोरे यांच्या हस्ते महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पदाधिकारी व कार्यालयीन कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.