प्रतिनिधि/ मुनीश्वर मलेवार
भंडारा जिल्ह्यात भर उन्हाळ्यात पावसाळा सारखे वातावरण तयार झाले असून दोन दिवसापासून जिल्ह्यात सर्वत्र ठिकाणी पाऊस पडत आहे त्यामुळे जिल्ह्यात गारवा निर्माण झाला आहे. जेमतेम उन्हाळाचे तापमान वाढत असताना अचानक निसर्गाने आपल्या वातावरणात कायापालट केली त्यामुळे पावसाळा सुरू झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली असली तरी परिसरात ओलावा गारठा निर्माण झालं आहे.पावसाच्या वातावरणात अनेक राजकीय उमेदवाराचे जाहीर सभा रैली वर सुद्धा या पावसाचे परिणाम दिसून पडेल उन्हाच्या तापमानावर काही अंशी नागरीकांना दिलासा मिळाला तरी पावसाने काही शेतीवरील भाजी पिकांचे नुकसान केले आहे सतत होणारी वातावरण बदलाचे नागरिकांच्या आरोग्यावर ही परिणाम जाणवतील यात शंका नाही