प्रतिनिधी मुनीश्वर मलेवार
तुमसर /मोहाडी
तालुक्यात ठीक ठिकाणी आरो शुध्द पाण्याचे केंद्रे बसवले गेले आहेत परंतु शुध्द पाण्याचं नावाने थंड पाण्याची विक्री करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे बहुतांश Ro केंद्रात शुध्द पाणी म्हणून थंड पाणी विकल्या जात आहे उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची गरज प्रत्येकाला असतेच आरो केंद्रात शुध्द पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात असते विवाह सोहळे, इतरत अनेक सार्वजानिक कार्यक्रमांत आरो पाणी चे मागणी मोठया प्रमाणात केली जात असते
अशुद्ध पाण्याचे वापर होऊ नये यासाठी RO केंद्रे बनविले जातात परंतु अशुद्ध पाणी हा आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे माहिती सगळ्यांनाच आहे शुध्द पाण्याचे व्यवसाय करिता आरो सयंत्र बसवून शहरात ग्रामीण भागात ठीक ठिकाणी आरो शुध्द पाण्याचे विक्री केंद्रे उभारली गेले आहेत परंतु काही ro केंद्र नावापूर्ती चालवली जात असून शुध्द पाण्याचे नावाखाली पिण्याचा पाण्याला शुध्द करण्याऐवजी फ्रिजर द्वारे थंड करून विक्री केली जाते असे चित्र बहुतांश RO संच बसवलेले ठिकाणी पाहावयास मिळते आहे उन्हाळयात थंड पाण्याची गरज प्रत्येकला भासत असते परंतु थंड पाण्यासोबत शुध्द पिण्याच्या पाण्याची पण आरोग्यासाठी गरजेचे झाले आहे परंतु बहुतांश Ro सयंत्र असलेल्या ठिकाणी शुध्द पाण्याच्या पुरवठा मिळत नसून केवळ फ्रिजर द्वारे थंड केलेलं पाण्याची सर्रास विक्री केली जात आहे या कडे सारर्स दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना शुद्ध पाण्याची नावाखाली केवळ थंड पाणी विक्री केले जात असते