![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
तुमसर प्रतिनिधि /:स्थानिक दुर्गानगर निवासी महक थावानी एल.ए.डी कॉलेज नागपूरची बी.ए. फायनलची विद्यार्थिनी आहे. अगदी कमी वयात कवयित्री म्हणून महकची प्रतिभा पुढे आली आहे. शहरातील व्यावसायिक कमलकुमार थावानी यांची महक मुलगी असून महकद्वारे लिहिलेल्या जुस्तजू कविता संग्रहाचे येथील पंचशील हॉटेल मध्ये प्रकाशन करण्यात आले. कविता हा साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे. कविता छंदोबद्ध व रसबद्ध असतात. कवितेतून जीवन कळते, समजते व उमगते. कविता, ओव्या, अभंग किंवा श्लोक हे साहित्याचे माध्यम आहे. त्यामध्ये मनाच्या भावना, वस्तुस्थिती किंवा मनःस्थिती व्यक्त करता येते. भारतात कवितांचा इतिहास आणि कवितांचे तत्त्वज्ञान फार जुने आहे. कविता शब्दांनी खूप समृद्ध असतात.ज्युस्तजु हा कविता संग्रह अॅमेझॉनवर उपलब्ध आहे.या पुस्तकातील कविता मनाला साद घालणाऱ्या असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.तर तुमसर तालुका प्रेस वेलफेअर तर्फे महक चा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.याबद्दल तिचा तुमसर चे उपविभागीय पोलीस अधिकारी रश्मिता राव,शिक्षण सभापती रमेश पारधी, माजी नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे,सिंधी समाजाचे अध्यक्ष गुलराज कुंदवानी महकचे आई -वडील यांच्यासह माध्यम प्रतिनिधी यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे संचालन प्रा. राहुल डोंगरे यांनी केले तर आभार तालुका प्रेस वेलफेअर चे सचिव अनिल कारेमोरे यांनी केले.बोलू तर सगळेच शकतात. पण, लिहिणे खूप कठीण आहे. महकने कविता संग्रह लिहून हे सिद्ध केले आहे.यावेळी महक ने आपल्यातील अनेकांना स्मार्टफोनचे व्यसन जडले आहे.याच व्यसनापासून दूर जाण्यासाठी अनेक जण सातत्याने प्रयत्न करत असतात.मोबाईलच्या वापरामुळे कौटुंबिक नात्यांकडे दुर्लक्ष करतात.त्यामुळे आता मोबाईल सोशल मीडिया चा कमी वापर करून वाचन करावे याकरिता ही कवीता संग्रह प्रकाशीत करत असल्याचे सांगितले.