![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
इंडियन हैडलाइन तिरोडा/ प्रतिनिधि
तिरोडा:- जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत पंचायत समिती शिक्षण विभाग तिरोडा तर्फे शाम मंगलम लान तिरोडा येथे शाळापूर्व तय्यारी सविचार सभा आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमाचे अध्यक्ष तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले हे होते यावेळी जी.प.शाळेच्या शिक्षणावर भर देत होतकरु व गरीब विद्यार्थ्याची गुणवत्ता हि शिक्षकावर अवलंबून असते तेव्हा शिक्षकानी यावर भर द्यावा तसेच मोठमोठे अधिकारी हे जी.प.शाळेतून शिक्षण घेतल्याचे निदर्शनास आले आहे जी.प.शाळेतील शिक्षक हे अनुभवी असून विविध प्रशिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्याच्या अध्ययणावर भर देण्यात येते त्यामाध्यातून वातावरन निर्मिती होत असते राष्ट्रनिर्मान करण्याकरिता शिक्षकाची महत्वाची भूमिका आहे व आजही समाजात शिक्षकाचे महत्वाचे स्थान आहे असे प्रतीपादन तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांनी दिले यावेळी प्रामुख्याने प.स.सभापती कुंता पटले, उपसभापती हुपराज जमाईवार, प.स.सदस्य डॉ.चेतलाल भगत, गटविकास अधिकारी विनोद चौधरी, संचालक मुकेश अग्रवाल व सर्व केंद्राचे केंद्र प्रमुख, शिक्षक,शिक्षिका उपस्थित होते यावेळी जी.प.शाळेतून प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्याचा आमदार महोदयांच्या हस्ते सत्कारसुद्धा करण्यात आला.