![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
इंडियन हैडलाइन न्यूज़/ तुमसर प्रतिनिधि
तुमसर: गोंदिया शिक्षण संस्थेद्वारा संचलित सेठ नरसिंगदास मोर कला, वाणिज्य व श्रीमती गोदावरी देवी सराफ विज्ञान महाविद्यालयात नुकतीच विद्यापीठ स्तरीय एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील इंग्रजी अभ्यास मंडळ, मोर महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) व इंग्रजी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार अभ्यासक्रम व विषयांची संरचना यांतील बदल सविस्तरपणे समजून घेण्याकरिता ही कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत प्रमुख अतिथी म्हणून डॉ. कपिल सिंघेल (अध्यक्ष, इंग्रजी अभ्यास मंडळ रा. तु. म. नागपूर विद्यापीठ) हे उपस्थित होते. कार्यशाळेचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चेतनकुमार मसराम हे उपस्थित होते. तसेच डॉ. राधेश्याम दिपटे (IQAC Co-ordinator), डॉ. कोमलचंद साठवणे (NEP Incharge) हे उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. कपिल सिंघेल म्हणाले की, “राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार प्रत्येक विषयामध्ये प्रमुख (Major) व किरकोळ (Minor) असे विविध प्रकारचे उपविषय असणार आहेत. याशिवाय खुले निवडक विषय (OE), कौशल्य संवर्धन विषय (SEC), पात्रता वर्धक विषय (AEC) असे विविध प्रकारचे विषय विद्यार्थ्यांना निवडता येतील. या बदला मागे शासनाचा आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन असून बहुविद्याशाखीय महाविद्यालयांमध्येच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास शक्य आहे. एस. एन. मोर महाविद्यालय हे या दृष्टीने सरस ठरते. राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार बदलत्या विषयानुरूप प्राध्यापकांच्या कार्यभारामध्ये सुद्धा अनेक बदल होत आहेत.”
या कार्यशाळेत आपल्या अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चेतनकुमार मसराम म्हणाले की, “आज वैश्विक स्तरावर असंख्य बदल होत असून शैक्षणिक धोरण म्हणजे या बदलांची नांदी आहे. त्यामुळे या बदलांसाठी सर्वांनी सज्ज राहायला हवे.” या कार्यशाळेत रा. तु. म. नागपूर विद्यापीठातील सुमारे ८० प्राध्यापकांनी सहभाग नोंदविला. या कार्यशाळेचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चेतनकुमार मसराम यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. रेणुकादास उबाळे व प्रा. अमोल खांदवे यांनी केले तर डाॅ. विजय वर्हाटे यांनी आभार मानले. या कार्यशाळेस प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.