![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
इंडियन हैडलाइन न्यूज़/ तुमसर प्रतिनिधि
कृषी उत्पन्न बाजार समितीचे छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती, तुमसर असे नामकरण करावे अशी छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान च्या वतीने मागणी चे निवेदन नवनियुक्त सभापती व संचालक मंडळाला देण्यात आले.
तुमसर शहर क्षेत्रातील एकमेव असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक व रमणीय असे परिसर आहे. तरी तुमसर शहरातील नागरिक व छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठानच्या वतीने ही मागणी असून, स्मारक परिसरात ये-जा करणे करिता तुमसर – भंडारा मार्गाच्या बाजूने फाटक तयार करण्यात यावी जेणेकरून पायी फिरणारे व मार्गक्रमण करणार्यांना तसेच तुमसर शहरातील नागरिक व बाहेरील येणारा शेतकरी वर्ग यांना बागेचा आस्वाद व महाराजांच्या थेट दर्शनाचा लाभ घेता येईल. यावेळी प्रतिष्ठान चे संस्थापक/ अध्यक्ष इंजि. नितीन धांडे व प्रतिष्ठान चे सचिव प्रा. अमोल उमरकर, अंकुश गभने यांनी उपस्थित सभापती, उपसभापती व समस्त संचालक मंडळाला निवेदन सादर केले. निवेदनावर सकारात्मक विचार करून निर्णय घेण्याचे आश्वासन सभापती महोदय श्री. भाऊरावजी तुमसरे व उपसभापती महोदय श्री. रामदयालजी पारधी यांनी दिले यावेळी संचालक श्री. हरेंद्रजी रहांगडाले, श्री. किरणजी अतकरी, श्री. राजुजी माटे, व बाजार समितीचे सचिव श्री. भोयर साहेब उपस्थित होते