![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
अश्या संकटात एकमेकांना सहकार्य करा खा.डॉ.प्रशांत पडोळे यांची पूरग्रस्त, नुकसान ग्रस्त गावाला, शेतकरी, त्या कुटुंबाला भेट
◆ प्रशासनाला दिले तसे निर्देश
◆ तहसीलदार, महसूल,कृषी, गोसे, तलाठी, ग्रामसेवक, सरपंच उपस्थित होते.
आसगाव / शेंद्री ता. पवनी
भंडारा:- आसगाव येथे सततच्या पावसाने थैमान घातले, किती मोठे हे पावसाचे संकट होते, सर्व मिळून सहकार्य करू, शेतकऱ्यांच्या शेत पिकाची, आणि अतिवृष्टीमुळे अनेकांचे घरांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, पुराचे पाणी घरात शिरले, सततच्या अतिवृष्टीमुळे अनेकांचे घरे पडले, भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांनी महसूल विभाग, कृषी विभाग, गोसे विभाग येथील अधिकारी
यांना सोबत घेऊन शेतकऱ्यांच्या शेतपिकासह, अतिवृष्टीने पडलेल्या घराचे तात्काळ पंचनामे करून त्यांना मदत करा, असे सांगितले, तुटपुंजी रक्कम देऊ नका, वाढीव प्रस्ताव सादर करा. असेही यावेळी संबधीत अधिकारी यांना तसेच प्रशासनाला तश्या सूचना केल्या आहेत असेही यावेळी शेतकरी आणि ग्रामस्तांना खा.डॉ.प्रशांत पडोळे यांनी सांगितले. कोंढा, वासेळा, लोणारा, आसगाव, पिंपळगाव, खैरी पट, मांदेड, कुडेगाव, रोहिणी, किरमती, नांदेड असा पवनी, लाखांदूर असा तालुक्यातील पूरग्रस्त गावाला, शेतकऱ्यांच्या शेत पिकाची पाहणी, सततच्या अतिवृष्टीने पडलेले घरे याची पाहणी करून सरसकट पंचनामे करा असे निर्देश संबधीत अधिकारी यांना दिले आहेत. त्या गावाची, शेत पिकाची पाहणी केली.
सर्व आसगाव वाशीयांना खावटी द्या, एकही कुटुंब वंचित
कामा नये, अशी सूचना जिल्हाधिकारी भंडारा, तहसीलदार पवनी यांना दिले, पडक्या, आणि पडू शकणारे घरे, त्या घर कुटुंबांना तात्काळ घरकुल द्या, शेतकऱ्यांना बी बियाणे सबसिडीवर द्या, शेतकऱ्यांना जनावरांचा चारा उपलब्ध करून दया, कॅनलवरचे अतिक्रमण काढा, नालेचे खोलीकरण करा, असे निर्देश जिल्हाधिकारी सह संबधीत अधिकारी यांना प्रत्यक्ष सांगितले. योग्य पंचनामे न झाल्यास रस्त्यावर येईन असेही यावेळी सांगितले. अनेकांच्या घरातील अन्नधान्य पुरात गेले, भिजले, कागदपत्रे गेली. सरसकट पंचनामे करा, कोनालाही वंचित ठेवू नका.
सर्व पंचनामे तात्काळ करा. कोणीही वंचित राहता कामा नये, याची खबरदारी घ्या
यावेळी श्री.नानाभाऊ पटोले अध्यक्ष काँग्रेस कमिटी महा. राज्य.,श्री. प्रेमसागरजी गणवीर माजी जिल्हाध्यक्ष काँग्रेस भंडारा,
श्री. गंगाधरजी जीभकाटे अध्यक्ष जि.प भंडारा,
श्री. धनंजयजी तिरपुडे महासचिव भंडारा,
श्री. विकासजी राऊत उपाध्यक्ष भंडारा
श्री. महेंद्रजी सोनवाणे तहसिलदार पवनी,
श्री. शंकरजी तेलमासरे ता.अध्यक्ष पवनी,
श्री. विनोदजी वानखेडे कॅनल अधिकारी गोसे विभाग पवनी,
श्री. दिपकजी गरुड BDO पवनी,
सौ. बिशिताताई कोरे सरपंच आसगाव,
श्री. महेशजी फुंडे उपसरपंच आसगाव,
सौ. संगीताताई बोरकर जि.प सदस्या,
श्री. विपिनजी बोरकर,
श्री. मोहितजी मोहरकर,
श्री. आशिषजी ब्राह्मणकर,
श्री. जीवनजी फुंडे,
श्री. मुकुलजी सावरबांधे,
श्री. अमोलजी मेश्राम उपस्थित होते.
उपस्थित शेतकरी, ग्रामवासी व पदाधिकारी कार्यकर्ते.