इंडियन हैडलाइन न्यूज़/ गोंदिया प्रतिनिधि
राज्यातील महायुति सरकार ने नुकतीच महिलाचे सबलीकरण व आत्मनिर्भर करण्यासाठी “मुख्यमंत्री – माझी लाडली बहीण” महत्वकांक्षी योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांनी घ्यावा याकरिता महिलांच्या सहकार्यार्थ सहायता केंद्र सुरु करण्यात आले आहे.
खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या निर्देशानुसार व माजी आमदार श्री राजेन्द्र जैन यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी कांग्रेस भवन (कार्यालय), रेलटोली गोंदिया येथे महिलांच्या सहकार्यार्थ योजनेच्या सुविधेकरिता सहायता केंद्र सुरु करण्यात आले आहे. यात महिला सोबत पुरुष कार्यकर्त्यांची ची टीम ऑनलाईन आणि ऑफलाइन आवेदन फार्म भरून जमा करण्यात येत आहे.
माजी आमदार श्री राजेन्द्र जैन म्हणाले कि, “मुख्यमंत्री – माझी लाडली बहीण” महत्वकांक्षी योजनेचा लाभ प्रत्येक लाभार्थी महिलांना मिळाला पाहिजेत या करीता आमचा लक्ष आहे. सेतू केंद्र व अन्य ठिकाणी आवेदन भरण्यास होत असलेल्या अडचणीचा सामना करावा लागू नये याकरिता सहायता केंद्र सुरु करण्यात आले आहे. राष्ट्रवादी कांग्रेस भवन (कार्यालय), रेलटोली येथे येऊन महिला योजनेचे आवेदन भरू शकतात.
सदर योजनेचा आवेदन फॉर्म भरण्यास सुविधा व्हावी याकरिता मार्गदर्शन व सहयोग प्रदान करण्यास एक यूनिट तयार करण्यात आले आहे. योजनेचा लाभ घेणारी महिला एक फोटो, अपडेट आधार कार्ड, राज्याचा रहिवाशी दाखला नसेल तरजन्म प्रमाणपत्र, पिवळे किव्हा केशरी राशन कार्ड, टी. सी, बँक पास बुक, मतदान कार्ड, अन्य झेरोक्स कॉपी व दुसऱ्या राज्यातील महिला लग्नानंतर महाराष्ट्रातील रहिवासी असल्यास वरील दस्तावेज किव्हा नसल्यास पति ची टी. सी, या जन्म प्रमाणपत्र यापैकी कोणताही पुरावा घेऊन आवेदन भरावे व या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी आमदार श्री राजेन्द्र जैन यांनी केले आहे.