![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
इंडियन हैडलाइन न्यूज़/ तुमसर प्रतिनिधि
शहरातील विविध भागात नागरिकांच्या घरालगत कुठे खांब नसल्याचे तर कुठे खांब उपलब्ध असून देखील त्यावर पथदिवे नसल्याने रात्री काळाकुट्ट अंधार असल्याचे पाहायला मिळत आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने साप व इतर कीटकांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे. वरील परिस्थिती पाहता अंधाराच्या मदतीने चोरी किंवा इतर अनपेक्षित घटना होण्याचे नाकारता येत नाही, सोबतच शहरात खाली प्लॉट, खड्डे अश्या विवीध ठिकाणी साचलेल्या पण्याचे योग्य नियोजन आणि कीटकनाशकांची फवारणी करावी जेणे करून नागरीकांच्या आरोग्याची काळजी घेता येईल वरील विषयात मुख्याधिकारी साहेबांनी तातडीने दखल घेऊन आवश्यक असलेल्या ठिकाणी खांब व पथदिव्यांची व्यवस्था, कीटकनाशक फवारणी करून देण्यात यावी असे मागणी पत्र छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान, तुमसर च्या वतीने मुख्याधिकारी नगर परिषद तुमसर यांना देण्यात आले यावेळी छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान तुमसर चे संस्थापक अध्यक्ष इंजि. नितीन धांडे, अंकुश गभने, महेश वाट उपस्थित होते.