![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
इंडियन हैडलाइन न्यूज़/ तुमसर प्रतिनिधि
आमदार राजूभाऊ माणिकरावजी कारेमोरे यांच्या वतीने उसर्रा येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ECG, नेत्ररोग, औषध, शस्त्रक्रिया, स्त्रीरोग, बालरोग, कान, नाक व घसा, अस्थिरोग, त्वचारोग, श्वसनविकार व तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने येऊन सर्व रुग्णांची तपासणी केली. शिबिरात रुग्णांना चष्मे व औषधे देण्यात आले. या महाआरोग्य शिबिरात १५७० हून अधिक लोकांनी उपचार केले. ४८० चष्म्याचे वाटप करण्यात आले असून २७८ रुग्णांना ऑपरेशनसाठी नागपूरच्या रुग्णालयात पाठविण्यात येणार असून संपूर्ण उपचार मोफत केले जाणार आहेत. तुमसर-मोहाडी विधानसभा मतदार संघात अनेक ठिकाणी अशाच प्रकारचे महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले जाणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, अशी विनंती राजूभाऊ कारेमोरे यांनी केले आहे.
#महाआरोग्य_शिबिर #रोगनिदान_शिबिर
#निःशुल्क #आपला_माणूस
#आमदार_राजूभाऊ_कारेमोरे