![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
इंडियन हैडलाइन न्यूज़/ गोंदिया प्रतिनिधि
◆ खा.डॉ.प्रशांत पडोळे यांचे शुभचिंतक उमेश मोहतुरे यांचे विशेष सहकार्य
भंडारा-गोंदिया:- भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रातील खा.डॉ.प्रशांत पडोळे यांनी संभाजीनगर नगर येथे गेलेल्या भंडारा जिल्ह्यातील महिलांना परतीसाठी केली मदत.
भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांचे शुभचिंतक उमेश मोहतुरे यांनी सतत पाच तासापासून भंडाऱ्याचे पोलीस अधीक्षक श्री.लोहितजी मत्तानी यांच्या संपर्कात राहून, कदिम जालना पोलिस स्टेशन च्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून त्यांना स्वगावी भंडाऱ्यात येईपर्यंत सहकार्य केले. भंडारा पोलीस अधीक्षक लोहितजी मत्तानी साहेब यांचे महत्त्वाचे सहकार्य यावेळी लाभले. रात्री 3 पर्यंत त्या महिलांन सोबत भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खा.डॉ.प्रशांत पडोळे, भंडारा पोलिस अधीक्षक लोहितजी मत्तानी, खा.डॉ.प्रशांत पडोळे यांचे शुभचिंतक उमेश मोहतुरे सतत संपर्कात राहून डिझेल,जेवणाची व राहण्याची व्यवस्था यावेळी केल्या गेली. महिलांनी कुठेतरी फसवणूक झाल्याचे यावेळी सांगितले आहे.
महिलांनी घाबरून न जाता मी तुमच्या पाठीशी आहो असे भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खा.डॉ.प्रशांत पडोळे आणि भंडारा पोलीस अधीक्षक श्री.लोहितजी मत्तानी यावेळी संपर्कात राहून बोलले. एक मेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ या म्हणी प्रमाणे सहकार्य करणे, माणुसकीचा धर्म जपणे खुप महत्वाचे आहे.
भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खा.डॉ.प्रशांत पडोळे यांचे शुभचिंतक उमेश मोहतुरे यांचे यावेळी सहकार्य केल्याबद्दल सर्वांनी कौतुक केले.
शनिवार दिनांक १० ऑगस्ट २०२४ ला भंडारा पोलीस अधिक्षक लोहितजी मत्तानी यांची भेट भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खा.डॉ.प्रशांत पडोळे यांचे शुभचिंतक उमेश मोहतुरे यांनी भंडारा येथे घेतली. संभाजी नगर औरंगाबाद येथे काल घडलेल्या प्रसांगाबद्दल चर्चा करण्यात आली. यावेळी भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खा.डॉ.प्रशांत पडोळे यांचे शुभचिंतक उमेश मोहतुरे, नितेश मारवाडे, स्नेहल मेश्राम, सुगत शेंडे, निखिल शेंडे उपस्थित होते.