इंडियन हैडलाइन न्यूज़/ रामटेक प्रतिनिधि
मंगळवारला कु. रक्षिता गौरीशंकर बोरकुटे मु. नवरगाव, कु. सायली संतोष गाढवे मु. रामटेक, कु. तनुश्री विजय विश्वकर्मा मु. रामटेक ह्या तिन्ही मुली आग्रा (उत्तर प्रदेश) येथे होत असलेल्या थाईबॉक्सिंग नॅशनल चॅम्पियनशिप खेळण्याकरिता जात आहे करिता ह्या तीनही मुलींची घरची परिस्थिती हलाखीची असून त्यांना तेवढ्या दूर खेळण्यासाठी जाने शक्य नसल्यामुळे रामटेक विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस नेते श्री. चंद्रपालजी चौकसे (अध्यक्ष राष्ट्रीय पंचायती राज ग्राम प्रधान सरपंच संघटन महाराष्ट्र राज्य/पर्यटन मित्र रामटेक) यांनी या तिन्ही मुलींना आग्रा (उत्तर प्रदेश) येथे खेळण्याकरिता जाण्यासाठी आर्थिक मदत केली.
यावेळी श्री. अजय खेडकर (कोच), श्री. मोहन कोठेकर, श्री. शिशुपाल अतकरे (माजी सरपंच काचूरवाही), श्री. मयूर हटवार, श्री. अमित कुकवास उपस्थित होते.