
इंडियन हैडलाइन न्यूज़/ तुमसर प्रतिनिधि
छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान तुमसर द्वारा संचालित छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक वाचनालय विनोबा नगर तुमसर सुरू होऊन दिनांक 25 डिसेंबर 2023 रोजी 1 वर्ष पूर्ण झाले वर्षभरात छत्रपती शिवाजी महाराज वाचनालयात प्रतिदिन नियमितपणे 25 ते 30 विद्यार्थी व विद्यार्थिनी पोलिस भर्ती,आर्मी भर्ती, MPSC, UPSC, Banking अणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणारे, शहरातील व आजुबाजूच्या ग्रामीण भागातिल विद्यार्थी बसतात. या वाचनालयाचे नियमित वाचक असलेले डॉ. विपिन राघोर्ते यांनी वाचनालयात वर्षभर व नियमित केलेल्या अभ्यासातून विदेशातून शिक्षण घेतल्यानंतर आपल्या देशातील पात्रता परीक्षेत यश संपादन केले. आपल्या यशाचे श्रेय त्यांनी जिद्दीने केलेल्या अभ्यासाला व छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक वाचनालयाला दिले. वाचनालयाच्या मदतीने 10 वि, 12 वि च्या विद्यार्थ्यांना हक्काची अभ्यासिका मिळालेली आहे. यामाध्यमातून परिसरातील तसेच जवळपासच्या गावातील विद्यार्थ्यांना लाभ होतोय यातच वाचनालयाचे यश आहे यासाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नसून छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान हे आपल्या सदस्यता शुल्कातून लागणारा खर्च करतो. विद्यार्थ्यांना पूर्णतः मोफत अभ्यास सेवा पुरविणे हे प्रतिष्ठान चे एकमेव उद्दिष्ट आहे.





Total Users : 883062
Total views : 6488494
