![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
मुनीश्वर मलेवार/ प्रतिनिधी
वर्दळीचा तुमसर ते भंडारा महामार्ग खड्ड्यांचा मार्ग झालेला असून दिवसेंदिवस या मार्गावर खड्डेची संख्या वाढत आहे हा महामार्ग वाहनधारकांसाठी आता धोक्याच झालं असून अपघाताचा जीव घेणारा मार्ग होऊन बसलेला आहे या मार्गावर दिवसेंदिवस मोठ मोठी खड्डे पडत असल्याने खड्डे चुकविण्याचा नादात अपघात ही घडत आहे वाढत जाणारे खड्डे कडे प्रशासनाचे जरा दुर्लक्ष दिसून येत असून रस्ता जरी नवीन होत नसेल तर निदान खड्डे बुजविण्याचे काम तरी होणे गरजेचे आहे तुमसर भंडारा महामार्ग एकमेव वर्दळीचा मार्ग असून देखील या रस्त्यावर पडत असलेली खड्डे धोकादायक झाली आहेत त्यामुळे कित्येक वाहनाचे नियंत्रण सुटून अपघाताला कारणीभूत होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे दुचाकी आणि चारचाकी वाहने या खड्ड्यामध्ये उसळतात तर काही वाहन धारक खड्डे वरून आढळतात त्यामुळे हा महामार्ग अपघाताला निमंत्रण देणारे मार्ग झाले असून प्रशासनाने डोळे झाक न करीत निदान खड्डे तरी बुजविण्याचे माणुसकी ठेवली पाहिजे अशी मागणी या रस्त्यावरून चालणारी वाहनधारक करीत आहेत