



इंडियन हैडलाइन न्यूज़/ भंडारा प्रतिनिधि
भंडारा :- पोलीस आपल्यासाठी काम करतात ही भावना व हा विश्वास जनतेमध्ये निर्माण करण्यासाठी पोलीस विभागाने काम करणे गरजेचे आहे. “खाकी (पोलीस) वर्दी हाच माझा धर्म आणि देशाचे संविधान हाच न माझा धर्मग्रंथ आहे. सर्वसामान्यांच्या मनामध्ये सुरक्षेची भावना निर्माण करणे व गुन्हेगारांच्या मनात पोलीसा- 5’ची भिती निर्माण यासाठी आपण काम न करणार असल्याचे भंडारा जिल्हा पोलीस अधिक्षक नुरुल हसन यांनी न सांगीतले. भंडारा पोलीस हॉलमध्ये पत्रकारांशी संवाद साधतांना ते बोलत होते.
पोलीसांनी जनतेचे सेवक बनुन काम करणे गरजेचे आहे. जनतेच्या करावर त्यांना पगार मिळतो याची जाणीव पोलीसांनी ठेवायला हवी.चरस, गांजा, जुगार, सट्टा व गोतस्क री जिल्ह्यातून पूर्णतः हद्दपार करण्याचा काटेकोरपणे प्रयत्न अस णार आहे. यासाठी जनतेच्या सहकार्याची गरज असुन जनतेनी अवैध धंद्याविषयी पोलीसांना माहिती द्यावी. माहिती देणाऱ्यांचे नाव गुप्त ठेवले जाईल याची आपण हमी देत असल्याचे श्री. हसन यांनी यावेळी सांगीतले.
जिल्ह्यातील अवैध धंदे नष्ट करून शांतता व सुरक्षितता प्रस्थापित करणे हे पोलिसांचे कर्तव्य आहे. गुन्ह `गार कितीही मोठा असेल व त्यांनी गुन्हा केला असेल तरी त्याचेवर का रवाई नक्कीच होणार. कायद्यापुढे सर्व एकसमान आहेत. कर्णकर्कश आवाज काढणाऱ्या गाड्यांवर कारवाई करून त्यांचे सायलेन्सर काढण्याची कार वाई केली जाईल. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात जनावरे दिसुन येतात त्याम ळे अपघाताची शक्यता बळावली आहे. याकरीता नगर परिषद व पशु संवर्धन विभागाच्यावतीने या जनाव रांचा बंदोबस्त करण्यात येईल. यासाठी आपण स्वतः जिल्हाधिकारी यांचेशी चर्चा करणार असल्याचे त्या ‘नी सांगीतले. अवैध धंद्यात कार्यरत असलेल्या पोलिसांवर कडक कारवाई करण्यात येईल. महिलांवर होणार अन्याय, अत्याचार थांबविण्यासाठी दामिनी पथक नव्याने अक्टिव्ह करण्यात येतील. शहरात विविध ठिकाणी क्यू आर, कोड लावण्यात येतील. त्या परीसरात पोलिसांना भेट देणे सक्तीचे करण्यात येणार आहे. पोलीस कुटुंबांसाठी चांगले काम करु. ई-दरबार सुरू करू. जिल्ह्यात. स्वच्छ वचांगले प्रशासन देण्याचा प्रयत्न करु असेही नुरुल हसन म्हणाले. नुकतेच बदलून गेलेले पोलीस अधीक्षक लोहित मतांनी यांनी अनेक चांगले उपक्रम सुरु केलेत ते सर्व उपक्रम सुरुच राहणार असून ते उपक्रम आण- खी चांगले करण्याचा आपला प्रयत्न राहील, असेही पोलीस अधीक्षक नुरुल हसन म्हणाले. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातखेडे उपस्थित होते.