![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
इंडियन हैडलाइन न्यूज़/ तुमसर प्रतिनिधि
राज्यात सातत्याने महिला अत्याचारांच्या घटने मध्ये वाढ होत असून गुन्हेगारांना कायद्याचे धाक आहे किंवा नाही हा प्रश्न समस्त नागरिकांना पडला आहे. एकीकडे आपले शासन बेटी पढाव बेटी बचाव अभियान राबविते मात्र दुसरी कडे अशा घटना घडणे हे महाराष्ट्र च्या दृष्टीने योग्य नसून अशा घटनाविरोधात कठोरात कठोर शासन होणे अपेक्षित आहे. आज घडीला महाराष्ट्र मध्ये गुन्हेगारी खूप वाढत असून गृह विभागाच्या कारभारावर देखील प्रश्न उपस्थित होत आहेत, अशा घटनामुळे खरच महाराष्ट्रातील मुली, बहिणी सुरक्षित आहेत का? आज विध्येच माहेर घर म्हनून ज्याला आपण संभोधतो त्या शाळेत आज मुली सुरक्षित नाही मग कस होणार या बेटी पढाव बेटी बचाव या अभियानाच । नुकतीच बदलापूर मध्ये २ निरागस चिमुकल्या मुली ज्यांची वय अवघे ३ वर्ष आहेत त्यांचावर लैंगिक अत्याचार करून बलात्कार करण्यात आला व पोलिसांनी सुद्धा गुन्हा दाखल करण्यास तब्बल १२ तास लावले हे खूप संतापजनक प्रकार आहे. मुळात अशा घटनाची पुरावृत्ती होऊ नये मनून शक्ती कायदा अमलात आल पाहिजे व अशा घटनांना आडा घालण्या संघर्भात कठोर पाऊले सरकार मनून आपण उचलली पाहिजे.
आज शाळे मध्ये सुद्धा अनेक पाल्य आपल्या मुलांना पाठवीत असते मात्र जेव्हा जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा पाल्यांना सुद्धा आपल्या मुलांची काळजी लागून राहिली असते कि आज बदलापुरात झाल उद्या आमच्यासोबत देखील असा प्रकार होऊ शकतो या चितेत आज प्रत्येक पाल्य आहे म्हणून शाळा प्रशासनावर सरकारने लक्ष ठेवल पाहिजे व भविष्यात अशा घटना घडू नयेत याची काळजी सरकार व प्रशासनांनी नि देखील घेतली पाहिजे व बदलापुरात झालेल्या बलात्कारातील आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. हिच आपणास विनंती.
विनीत:- अश्विन देशमुख सामाजिक कार्यकर्ता तुमसर