![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
इंडियन हैडलाइन न्यूज़/ रामटेक प्रतिनिधि
रामधाम (तीर्थ) मनसर येथे श्री. चंद्रपाल चौकसे पर्यटक मित्र, रामटेक को –ऑपरेटिव्ह कृषी उद्योग रामटेक तर्फे महिला बचत गट सशक्तिकरण अभियान अंतर्गत आर्थिक विकासाकरिता तांत्रिक प्रशिक्षण शिबीर मार्फत माँ. पार्वती सभागृह, रामधाम तीर्थ मनसर येथे नववारी पातळ शिवण्याचे एक दिवशीय प्रशिक्षण* घेण्यात आले. या प्रशिक्षणाचे उदघाटन रामधामचे संस्थापक श्री. चंद्रपालजी चौकसे (अध्यक्ष, राष्ट्रीय पंचायती राज ग्रामप्रधान सरपंच संघटन महाराष्ट्र राज्य / पर्यटक मित्र रामटेक) यांचा हस्ते करण्यात आले. या प्रशिक्षणात महिलांना नववारी पातळ कसे शिवायचे व कोणता कापड घ्यायचा अशी सविस्तर माहिती सौ. दीपालीताई वाघमारे यांनी प्रशिक्षणात उपस्थित सर्व महिलांना दिली. या प्रशिक्षणात 400 ते 500 महिलांची उपस्थिती होती. बचत गटाच्या महिलांनी रोजगार प्राप्त होण्याकरिता उत्सुकतेणे प्रशिक्षणात सहभागी झाल्या. रामटेक को ऑपरेटिव्ह कृषी उद्योग मार्फत महिलांना सशक्त बनविण्यासाठी महिला बचत गटांना व युवक व युवतीना कुटीर उद्योग स्थापित करून रोजगाराची संधी प्राप्त करून देऊन दैनंदिन उपयोगाचे पदार्थ बनविण्याकरिता मोफत प्रशिक्षण देऊन रोजगार निर्मित करण्यात येईल, कुटीर उद्योग सुरु करण्याकरिता आर्थिक सवलती बाबत मोफत मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात येईल. इच्छुक बचत गटांना उद्योग सुरु करण्याकरिता उद्योग सामग्री संदर्भात मार्गदर्शन करण्यात येईल, महिला बचत गट द्वारा निर्मित वस्तुंना नागपूर, पुणे, मुंबई, नाशिक व इतर महानगर येथे विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येईल असा विश्वास श्री. चंद्रपाल चौकसे यांनी दिले. प्रशिक्षणात आलेल्या सर्व महिलांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. अतिशय आनंदमय वातावरणात कार्यक्रम संपन्न झाले. संचालन श्रीमती. पूनम गुरफेडे व कु. स्वाती शेंडे यांनी केले.
यावेळी प्रा. अनिलकुमार दुबे, श्री. कुणाल महाजन, सौ. श्रीवर्धा मलगे, सौ. सोनूताई शंकर होलगिरे, सौ. कविताताई प्रवीण होलगिरे, श्री. श्रीकिशन उईके (सरपंच चोखाळा-किरणापूर), सौ. कलावती तिवारी, सौ. मदाताई उईके, सौ. रेखाताई कठोते, सौ. पुष्पा आतिलकर, श्री. महादेवजी हटेवर, प्रा. अनिकेत मुंड, सौ. दीपालीताई वाघमारे, श्री. दिनेश बालपांडे, श्री. धर्मेंद्र दुपारे, श्री. सुनील फाटे, सौ. इंदिराताई हटवार व बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या