
इंडियन हैडलाइन न्यूज़/ तिरोडा प्रतिनिधि
तिरोडा:- तिरोडा साकोली मार्गावर वडेगाव येथे माध्यमिक ते उच्च माध्यमिकपर्यंतचे शिक्षण विद्यार्थी घेत असून यामध्ये प्रामुख्याने बिरसी, लाखेगाव, खोडगाव,बोपेसर,येथील विद्यार्थी शिक्षण घेत असतात शिक्षणाकरिता विशेषत:मुली बसने प्रवाश करीत असून शासनाने मानव विकास कार्यक्रम अंतर्गत मोफत प्रवास केलेला आहे तसेच सामान्य बसमध्ये पासेसची सुविधा केलेली आहे या मार्गावर बस वाहकाकडून विद्यार्थ्यानिना गैरवर्तणूक होत असल्याबाबतची तक्रार तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांना प्राप्त होताच तातडीने दखल घेत बस आगाराला भेट देऊन विद्यार्थी यांचे समक्ष अधिका-यांना बोलावून विद्यार्थ्यासमक्ष विभागीय नियंत्रक यांचेशी समस्यांचे निराकरण केले व यानंतर अशी तक्रार पुन्हा प्राप्त झाल्यास कार्यवाहीस समोरे जावे लागेल अशा सूचना दिल्या यावेळी प्रामुख्याने बस आगार प्रमुख संजना पटले,जी.प.सदस्या माधुरी रहांगडाले, प.स.सदस्य जयप्रकाश पटले, मा.संचालक तिरुपती राणे, पत्रकार दीपक गीरेपुंजे, रमाकांत खोब्रागडे व भीमराव विद्यालय वडेगाव येथील विद्यार्थिनी हजर होते.





Total Users : 883062
Total views : 6488494
