![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
इंडियन हैडलाइन न्यूज़/ तुमसर प्रतिनिधि
तुमसर (१६ ऑगस्ट, भंडारा) : सन २०२४-२५ या वर्षा करीता गाव नमुना नंबर ७/१२ मध्ये खरीप हंगामाची पिक पाहणी नोंदणी १ ऑगस्ट पासून सुरू झाली असल्याने तुमसर तालुक्यातील शेतकरी बांधवांनी मोबाईलमध्ये ई-पीक पाहणी व्हर्जनच्या माध्यमातून नोंदणी करून घ्यावी. नोंदणीसाठी १५ सप्टेंबर पर्यंत मुदत असून शासकीय योजनांच्या लाभासाठी नोंदणी आवश्यक असल्याचे तहसीलदार मोहन टिकले यांनी सांगितले.
शासनाने ऑनलाईन पिक पाहणी करण्याकरिता अँप सुरू केले आहे. शेतकर्यांनी आपल्या मोबाईलमध्ये हे अँप घेत आपल्या क्षेत्राची माहिती देवून पीक पाहणी नोंद करणे गरजेचे आहे. पिक पाहणी नोंद करताना अडचण आल्यास महसूल प्रशासनाशी संपर्क साधावा. पीक पेरा नोंदविणे गरजेचे आहे. शासनाच्या विविध योजना, कृषी, फलोत्पादन, नैसर्गिक आपत्ती, नुकसान, पिक विमा, शासकीय आधारभूत किंमत, धान्य खरेदी योजना, खतांवरील सबसिडी आदी योजनांच्या लाभासाठी पीक पाहणी आवश्यक आहे. पीक पेरा नोंदीसाठी आडचणी आल्यास गावातील तलाठी कार्यालय, मंडळाधिकारी, तहसिल कार्यालयातील कूळ कायदा यांच्याशी संपर्क साधावा!