![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
इंडियन हैडलाइन न्यूज़/ साकोली प्रतिनिधि
– भरलेल्या एकूण 73 हजार 710 अर्जांपैकी 68 हजार 704 अर्ज पात्र ठरल्याची प्रकाश बाळबुधेंची माहिती
(वार्ताहर) : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेला साकोली विधानसभा क्षेत्रात भरघोस पाठिंबा मिळाला होता. यात योजनेसाठी आलेल्या अर्जांपैकी 93% अर्ज पात्र ठरले आहेत. साकोली विधानसभा क्षेत्रातील साकोली, लाखनी, लाखांदूर या तीनही तालुक्यांचे मिळून एकूण 73 हजार 710 महिला लाभार्थ्यांचे अर्ज आले होते. यापैकी 68 हजार 704 अर्ज पात्र ठरल्याची माहिती योजनेच्या साकोली विधानसभा क्षेत्राच्या शासकीय समितीचे अध्यक्ष प्रकाश बाळबुधे यांनी दिली. 6 ऑगस्ट 2024 पर्यंत दाखल झालेल्या एकूण अर्जांच्या आकडेवारीच्याआधारे त्यांनी ही माहिती दिली.
प्रकाश बाळबुधे यांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, साकोली तालुक्यातून 26 हजार 868 इतके अर्ज महिला लाभार्थ्यांनी दाखल केले होते. त्यापैकी 24 हजार 353 अर्ज पात्र ठरले. यातल्या एकूण अर्जांपैकी 24 अर्ज रद्द करण्यात आले तर 2491 अर्ज तांत्रिक त्रुटीसाठी तात्पुरते नामंजूर करण्यात आले. लाखनी तालुक्यातून 24 हजार 73 इतके अर्ज महिला लाभार्थ्यांनी दाखल केले होते. त्यापैकी 22 हजार 269 अर्ज पात्र ठरले. यातल्या एकूण अर्जांपैकी 5 अर्ज रद्द करण्यात आले तर 1799 अर्ज तात्पुरते नामंजूर करण्यात आले. लाखांदूर तालुक्यातून 22 हजार 779 इतके अर्ज महिला लाभार्थ्यांनी दाखल केले होते. त्यापैकी 22 हजार 082 अर्ज पात्र ठरले. यातल्या एकूण अर्जांपैकी 20 अर्ज रद्द करण्यात आले तर 667 अर्ज तात्पुरते नामंजूर करण्यात आले आहेत. तीनही तालुक्यांतून एकूण 4957 अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत.
नामंजूर अर्ज पुन्हा एडीट करता येणार – प्रकाश बाळबुधे
योजनेतील नामंजूर अर्जांबद्दल माहिती देताना प्रकाश बाळबुधे म्हणाले की, “मंजूर करताना मराठीत अर्ज जे आले होते ते देखील पात्र ठरविण्यात आलेआहेत. त्यामुळे, मराठीत भरलेले अर्ज नामंजूर होत आहेत या सोशल मीडियावर पेरलेल्या बातमीत तथ्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. फक्त, मराठीत अर्ज भरताना घ्यावयाची मुख्य काळजी म्हणजे आधार कार्डप्रमाणेच तुमचे नाव असणे अपेक्षित आहे. दरम्यान, साकोली विधानसभा क्षेत्रात तीनही तालुक्यांचे मिळून तात्पुरते नामंजूर करण्यात आलेले एकूण अर्ज हे 4957 असून 49 अर्ज रद्द करण्यात आले आहेत. यापैकी नामंजूर झालेले 4 हजार 957 अर्ज हे तांत्रिक त्रुटीमुळे तात्पुरत्या स्वरूपात नामंजूर करण्यात आले आहेत. परंतु, त्यातल्या तांत्रिक त्रुटींचं निवारण करून ते पुन्हा स्वीकारले जातील. प्रामुख्याने ऑनलाईन भरलेला अर्ज एकदाच एडीट करता येऊ शकतो ही अडचण आहे. मात्र, संबंधित सॉफ्टवेअरमध्ये दुरुस्ती करण्यात येऊन तो आता इथून पुढे कितीही वेळा एडीट करता येऊ शकणार आहे. 3 – 4 दिवसांतच ही सोय सगळ्यांना ऑनलाईन उपलब्ध होईल.”
19 ऑगस्टला पात्र लाभार्थ्यांना 3000 रुपये मिळणार
या योजनेत पात्र ठरलेल्या महिला लाभार्थ्यांना येत्या 19 तारखेला जुलै आणि ऑगस्ट असे दोन महिन्यांचे मिळून 3 हजार रूपये प्राप्त होणार आहेत. अशी माहितीही बाळबुधे यांनी दिली.
सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन
ही योजना यशस्वी होण्यासाठी शासनाच्या तीनही तालुक्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस मेहनत घेतली आणि ही योजना मार्गी लावली. साकोली, लाखनी, लाखांदूर च्या तीनही तहसीलदार यांचे व उपविभागीय अधिकारी श्रीमती अश्विनी मांजे यांचे प्रकाश बाळबुधे यांनी विशेष आभार व्यक्त केले.