![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
इंडियन हैडलाइन न्यूज़/ तुमसर प्रतिनिधि
मा. उपविभागीय पोलिस अधिकारी, तुमसर
मा. पोलिस निरीक्षक, तुमसर
उपरोक्त विषयाच्या अनुशंगाने आपणास कळविण्यात येते कि, मागील काही दिवसापासून तुमसर शहरात झपाट्याने HIT AND RUN च्या घटना घडत असून शहरात कायदा सुव्यवस्था आहे कि नाही असा प्रश्न समस्त तुमसर वासियांना पडला आहे. त्याचे कारण असे कि गत काही दिवसात HIT AND RUN च्या घटने मध्ये २ युवकांच्या बळी गेला त्याच्या शोध अद्याप पर्यंत पोलीस प्रशासनाला लावला आला नाही. नुकतीच १५ आगस्ट ला सायंकाळी ७ च्या सुमारास एका मद्यधुंद कारचालकाने एका सायकल स्वारास धडक दिली व कारचालकाणे तेथून पड काढला त्याचा सुद्धा शोध पोलिक प्रशासनाला आता पर्यंत लावता आला नाही त्याचप्रमाणे काही महिन्या पूर्वी रामकृष्ण नगर येथील पलाश तलमले याला सुद्धा एका कारचालकाने धडक दिली ज्यात दुर्दैवाने पलाश च्या जागीच मृयू झाला पण अजूनही त्या कारचालकाच्या शोध पोलिसांना लागला नाही त्यामुळे नागरिकांच्या पोलिसांप्रती विश्वास उडत चालला आहे अस सध्याच्या घटनामधून दिसून येत आहे त्याचप्रमाणे शहरात चोरीच्या घटना देखील वाढल्या आहेत. त्याच्या सुद्धा छडा पोलीस प्रशासनाला लावन्यास विलंब होत आहे त्यामुळे नागरिकानमध्ये खूप रोष पहावयास मिळत आहे व अशा घटना मुळे शहरात भीतीच वातावरण निर्माण झाल आहे त्यामुळे आपण या घटनाच्या लवकरात लवकर योग्य प्रकारे तपास करून या HIT AND RUN च्या घटनामधील आरोपींना जेरबंद करून पिडीताना न्याय मिळवून द्यावा त्याचप्रकारे शहरात होत असलेल्या चोरींच्या घटना देखील थांविण्यात योग्य उपाययोजना कराव्यात अशी आपनास विनंती करण्यात येते.
विनीत:-
अश्विन देशमुख सामाजिक कार्यकर्ता