![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
इंडियन हैडलाइन न्युज/ तुमसर प्रतिनिधी
महाराष्ट्रातील जनतेने लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला भरघोस मतदान करुन दाखविली आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी काही नेत्यांनी आपत्या वडिलधारी माणसाचे हात सोडले. मात्र, जे शिवछत्रपती महाराजांचे नाव घेत फोडाफोडीचे राजकारण करीत आहेत त्यांना महाराजांचा इतिहास माहीत नसेल तर त्यांनी तो समजून घ्यावा.
महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चालतो. याची अनुभूती महाराष्ट्रातील जनतेने लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला भरघोस मतदान करुन दाखविली आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी काही नेत्यांनी आपत्या वडिलधारी माणसाचे हात सोडले. मात्र, जे शिवछत्रपती महाराजांचे नाव घेत फोडाफोडीचे राजकारण करीत आहेत त्यांना महाराजांचा इतिहास माहीत नसेल तर त्यांनी तो समजून घ्यावा.
कारण महाराजांच्या स्वराज्यात चूकीला माफी होती, मात्र गद्दारांना महाराष्ट्र माफ करत नाही. त्यामुळे गद्दारांना धडा शिकवा आणि पुन्हा एकदा २०१९ ला जो इतिहास घडवला तो इतिहास घडवा, असे आवाहन शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी केले आहे. तुमसर (भंडारा) येथील शिवस्वराज्य यात्रेतून कोल्हे यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. यावेळी मंचावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अनिल देशमुख, किरण अतकरी, मधुकर कुकडे व पक्षाचे जिल्ह्यातील नेते उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीमध्ये आता जे गुलाबी रंगाच्या जॅकेट मध्ये वावरत आहेत त्यांचे गोंदिया भंडारा जिल्ह्यातील शिलेदार माझा पराभव व्हावा म्हणून माझ्या मतदारसंघात प्रचारासाठी आले होते. मात्र त्यांच्या प्रचाराने माझा पराभव झाला नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत मी भंडारा गोंदिया जिल्ह्यात प्रचारासाठी येणार असून हिसाब तो बराबर होगा म्हणत या गद्दारांचा हिसाब चुकता करणार आहे.
असा घनाघाती टोला खा. कोल्हे यांनी गोंदिया भंडारा जिल्ह्यातील अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना लगावला आहे. ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेनिमित्त जिल्ह्यात आले होते तेव्हा ते तुमसर येथील सभेत जमलेल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना बोलत होते. ते म्हणाले की, नव्याने इतिहास घडवण्याची जबाबदारी आपण सगळ्यांनी घ्यायची आहे. म्हणून आज आम्ही सगळे आपल्या दारात आलेले आहोत. सन २००९ ला भंडारा लोकसभेत पराभव झाल्यानंतरही शरद पवारांनी आपल्या मुलीला मंत्रीपद न देता या गोंदिया भंडारा जिल्ह्यातील एका बड्या नेत्याला राज्यसभेवर पाठवले. एवढेच नव्हे तर केंद्रात मंत्रीपदही बहाल केले.
साहेबांच्या मनात आले असते तर ते आपल्या मुलीलाही मंत्रिपद देऊ शकले असते. मात्र, साहेबांनी विश्वास असलेल्या या नेत्याला मोठे केले. परंतु ईडी सीडीच्या भीतीमुळे भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील या बड्या नेत्याने संघर्षाच्या काळात साहेबांचे बोट सोडले आणि साहेबांसोबत गद्दारी केली. अशा गद्दारांना आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवायची आहे. आता आपण बसायचे नाही कारण महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आणायचे असे महाराष्ट्राने ठरवले आहे.
तुतारी वाजवून हा विजयाचा नाद आपल्याला करायचा आहे, असेही ते म्हणाले. पुढे म्हणाले की, आज आमच्याकडे मंत्री संत्री नसल्यामुळे मंचावरील गर्दी कमी असली तरी माझ्यासमोर जमलेली ही प्रचंड गर्दी गद्दारांना धडा शिकवण्यासाठी जमली आहे. महाराष्ट्रातील ट्रिपल इंजिनचे सरकार यांना कळले आहे की लोकसभा निवडणुकीत मताची कडकी झाली.
त्यामुळे त्यांना बहिण लाडकी झाली, असा टोलाही खा. कोल्हे यांनी सरकारला लगावला आहे. लाडकी बहीण योजनेमुळे महिलांची मते आपल्याला मिळतील हा महायुती सरकारचा भ्रम असून आपण आपल्या घरातील उपयोगी असणारी वस्तू दुसऱ्या कुणालीही जशी पैशासाठी विकत नाही, तशा माझ्या बहिणीही आपले मत विकणार नाहीत. याची खात्री असल्याची ग्वाही खा. कोल्हे यांनी यावेळी आपल्या भाषणातून दिली.
हेलिकॉप्टर खरेदीसाठी सुट, सायकल खरेदी केली तर लूट हेलिकॉप्टर खरेदी करणाऱ्याला सुट आणि गाडी, मोटरसायकल, सायकल खरेदी केलं तर त्याच्या २८ टक्के , १८ टक्के किंवा २४ टक्के कर सरकार लावत आहे. महाराष्ट्राची महागाई कमी झाली पाहिजे.
तुमच्या शेतीमालाला चांगला दर मिळाला पाहिजे. कपाशीला चांगला दर मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवणारे महाराष्ट्रातले सरकार असले पाहिजे. अतिवृष्टी होते सरकार इकडे बघत नाही आणि मग सरकारच्या सभा होतात सामान्य माणसे यांच्या सरकारच्या सभांना जायला बंद झालेली आहेत.
लोकसभेला तुम्ही काय केले, भाजपला सत्तेतून घालवण्यासाठी मतदान केले. कारण काय तर हे सरकार भारतीय जनता पक्ष हा पक्ष या देशांमध्ये घटनेतल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेल्या तरतुदी बदलण्याचा, घटना बदलण्याचं काम करणार होते.
पण काहीही करून भाजपचं सरकार आलं नाही. दुसऱ्या दोन पक्षांना मदत घेऊन यांनी केंद्रात सरकार स्थापन केले. उमेदवार हा महाविकास आघाडीच्या संमतीने तुतारी वाजवणारा माणूस उभा राहिला तर ते चिन्ह घराघरापर्यंत पोचवण्याचं काम देखील तुम्ही केलं पाहिजे. असे आवाहन शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावेळी केले आहे.
युतीचे सरकार घालवण्यासाठी तुमचा आशीर्वाद हवा आगामी विधानसभेसाठी उमेदवाराची निवड करणे अवघड आहे. म्हणून आपण सगळ्यांनी किती क्षमतेने माणसं गोळा केलेली आहे, हे बघण्यासाठी ऐन गणपतीचा महोत्सव चालू असताना देखील शिवस्वराज्य यात्रा काढून आम्ही सगळे आपल्या दारात घेऊन बघण्याचा प्रयत्न करतोय. आनंददायी बाब म्हणजे जेवढे पुरुष आहेत बहुतेक तेवढ्याच महिला तुम्ही गोळा केलेल्या आहेत.
महाराष्ट्रातलं युतीचे सरकार घालवण्यासाठी तुम्हा सगळ्यांचा आशीर्वाद मिळाला पाहिजे. लहान मुलं मुली शाळेत जातात त्यांच्यावर अत्याचार कोणी करणार नाही, याची खात्री आम्ही महाराष्ट्राला देऊ. त्यामुळे आज लाडक्या बहिणीच सुरक्षित नाही. ही समाजात पसरलेली भावना कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करू, असेही पाटील म्हणाले.