![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
इंडियन हैडलाइन न्युज/ तुमसर प्रतिनिधी
देव्हाडा येथील 13 सप्टें च्या दुर्देवी घटनेच्या (अपघात)आरोपीला पकडण्यात करडी पोलीस स्टे ला यश मीळाले त्यांना सलाम
मित्रांनों 13 सप्टेंबरला मोहाडी तालुका अंतर्गत येणाऱ्या पोलीस स्टे हद्दीतील देव्हाडा येथे दुर्देवी अपघात झाला व यात दोन सख्खे भाऊ दगावले ही घटना सर्वांना हादरुन देणारी होती याची दखल पोलीस अधिक्षक नुरूल हसन यांनी घेतली व पोलीस स्टे करडी चे API मुंडे यांनी यावर कारवाई केली व नुसत्या घटना स्थळी सापडलेल्या चार चाकी गाडीच्या तुटलेल्या आरश्यावरुन आरोपी पर्यंत पोहचले.
त्यांनी सांगीतले की गाडी ही नरसिंह टोला कडून करडी च्या दिशेने आल्याची माहीती मिळाली व घटना स्थळी चालकाच्या बाजूचा आरसा तुटलेला घटना स्थळी मीळाला यावरुन त्यांनी ही गाडी जवळचीच असल्याचे अंदाज लावून टिम बनवून जवळपासच्या गावात तपास सुरु केला तेव्हा निलज येथे MH34/AB/0419 डाला गाडी मीळाली त्यानंतर गाडी मालक सुभाष उरकुडा भगत याचा तपास केल्यावर कबूल केले त्याला अटक करण्यात आली व न्यायालयात पाठविण्यात आले
करडी चे API मुंडे समोरच्या तपास करत आहेत!