![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
इंडियन हैडलाइन न्युज/ गोंदिया प्रतिनिधी
प्रतिनिधी/गोंदिया: गोंदिया विधानसभेतील जनता की पार्टी (चाबी संघटना) अंतर्गत शुरू असलेल्या कर्तव्यपूर्ती जनआशीर्वाद यात्रा अंतर्गत येणाऱ्या कामठा गावात २९ कोटी २३ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये आमदार विनोद अग्रवाल यांनी आपल्या भाषणात जनतेला संबोधित करताना सांगितले की, आम्ही बोलतो ते करतो, आम्ही खोटी आश्वासने देत नाही आणि 100 टक्के विकास झाला आहे असेही बोलत नाही, व आम्ही श्रेय घेण्याच्या राजकारणाला चालना देत नाही, आम्ही लाडकी बहिन योजना शुरू करण्याची मागणी केली होती प्रत्येकाच्या खात्यात पैसे येऊ लागले. विरोधकांकडून योजना बंद पाडण्याचे प्रयत्न सुरू असून दिशाभूल करण्याचे कामही केले जात आहे. सर्वांगीण विकास हाच आमचा उद्देश आहे, आम्ही भेदभाव आणि वैयक्तिक राजकारणाला चालना देत नाही, तर सर्व समाज समाजातील सर्व घटकांसाठी आणि त्यांच्या प्रगतीसाठी काम करतो, असे आमदार विनोद अग्रवाल यांनी सांगितले.
या भूमिपूजन व उद्घाटन समारंभात आमदार विनोद अग्रवाल यांनी मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी आमदार पदावरून मिळणाऱ्या मानधनातून त्यांना मानधन देऊन शिक्षण देण्याचे काम करत असल्याचे सांगितले. जेव्हा पूरपरिस्थिती निर्माण होते तेव्हा ते परिस्थितीचा आढावा घेतात आणि नुकसान भरून काढण्यासाठी सरकारची मदत घेतात. शेतकरी असो, महिला असो, तरुण असो वा वृद्ध असो, सर्व वर्ग, समाज आणि जातींना पुढे नेण्याचा आम्ही संकल्प केला आहे. तुमचा मुलगा आणि तुमचा भाऊ विनोद अग्रवाल संकटकाळात तुमच्यासोबत होते. कोरोनासारख्या महामारीमध्ये मी रुग्णालयात ऑक्सिजन, खाद्यपदार्थ आणि इतर प्रकारची मदत केली आहे. आम्हाला फक्त 2.5 वर्षांच्या कार्यकाळासाठी काम करायला मिळाले, ज्यामध्ये तुम्ही सर्वांनी काम कसे केले ते पाहिले आणि तुमच्या सर्वांचे प्रेमळ आशीर्वाद तुमच्या मुलावर आणि भावावर असेल तर तुम्हाला आणखी काम पाहायला मिळेल, असे आमदार विनोद अग्रवाल म्हणाले.
कार्यक्रमात जनता की पार्टी (चाबी संघटना) च्या महिला तालुकाध्यक्ष चैतालीताई नागपुरे म्हणाल्या की, विनोद भैय्या यांच्या कार्यालयात जो जातो तो कधीच रिकाम्या हाताने परत येत नाही आणि आमदार सारखे साधे व्यक्तिमत्व आपल्याला लाभले हे आपल्या सर्वांचे भाग्य आहे. विनोद भैय्या हेच एकमेव आमदार आहेत जे लोकांच्या प्रत्येक संकटात त्यांना न्याय देतात आणि मदत करतात हे आपण नेहमीच पाहिले आहे आणि लाडकी बहिन या योजने शुरू करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.त्यात अनेक अटी होत्या ते रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आणि 21 ते ६५ वयोगटातील महिलांना लाभ मिळावा हे मागणी सुद्धा विनोद भैया ने केली त्यानंतर कार्यकर्त्यांच्या माध्यमातून महिलांचे फॉर्म भरण्याचे कामही केले, त्यामुळेच त्यांना जनतेचे आमदार म्हणून संबोधले जाते असे महिला तालुकाध्यक्ष चैतालीताई नागपुरे यांनी सांगितले.
भुमिपुजनाच्या तसेच लोकार्पणच्या या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने आ.विनोद अग्रवाल, पंचायत समिती सभापती मुनेश रहांगडाले, पृथ्वीराजसिंह नागपुरे, सरपंच रेखा सतीश जगने, महिला तालुकाध्यक्ष चैतालीताई नागपुरे, जाकिर खान, लतिश बालू बिसेन, किशोर दुबे, मिलन पाथोड़े, सुरज लिल्हारे, ग्राम पंचायत सदस्य गंगाबाई तांडेकर, ग्राम पंचायत सदस्य रमेश बुरले, ग्राम पंचायत सदस्य विद्याबाई वाघाडे, ग्राम पंचायत सदस्य सुभाष गायधने, ग्राम पंचायत सदस्य मंजूबाई सिंहमारे, ग्राम पंचायत सदस्य प्रियंकाबाई चंदेल, ग्राम पंचायत सदस्य संतोषकुमार बिसेन, ग्राम पंचायत सदस्य दुर्गेश्वरीबाई लिल्हारे, ग्राम पंचायत सदस्य चंद्रकलाबाई ब्राम्हणकर, ग्राम पंचायत सदस्य उमेन्द्र गजभिये, ग्राम पंचायत सदस्य विलास लिल्हारे, ग्राम पंचायत सदस्य मोहिनीबाई आसोले, महेश मस्करे, राधेश्याम मेंढे, गुड्डू सोनवाने, अशोक लिल्हारे, शंकर नारनवरे, मुन्ना लिल्हारे, निलेश असोले, आत्माराम भेलावे, तिलक भेलावे, पंकज बावनकर, सुनील गायधने, विजय खोब्रागढ़े, संतोष नागपुरे, संजू बहेकार, सोमाजी सूर्यवंशी, भोजराज आसोले, दिवाकर तांडेकर, आशिष आसोले, सुभाष गायधने, विरेंद्र सिन्ह्मारे, मनोज सिन्ह्मारे, ललित राउत, परमेश्वर महारवाडे, प्रभाकर शेंडे, भोला राउत, राजा तांडेकर, संजय तांडेकर, इत्यादी कार्यकर्त्ता तथा पदाधिकारी व मोठ्या संख्येने गणमान्य नागरिक उपस्थित होते.