![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
इंडियन हैडलाइन न्युज/ भंडारा प्रतिनिधी
जिल्ह्यात निर्माण झालेली पूर परिस्थिती, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा विषय आणि अन्य महत्त्वपूर्ण विषयाला घेऊन आज जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांची भेट घेत विस्तृत चर्चा केली. यावेळी काही सूचनाही करण्यात आल्या.
भंडारा जिल्ह्यात उद्भवलेल्या पूर परिस्थितीचा आढावा घेतला. ज्या ज्या गावांमध्ये पाणी शिरले आहे आणि लोकांना स्थलांतरित करण्यात आले. अशा लोकांना आवश्यक त्या सोयी सुविधा प्राधान्याने पुरविल्या जाव्या असे सांगितले. झालेल्या शेत पिकाच्या नुकसानाचे सर्वेक्षण करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच वैनगंगा नदी काठावरील बपेरा, रेंगेपार, बोरी या गावांचा नदीच्या प्रभावामुळे भूस्खल्लन होऊन शेतजमिनी व घरे यांचे नुकसान झालेले असल्याने या गावांचे आपत्ती व्यवस्थापन विभगाअंतर्गत डीपीआर तयार करून नुकसान भरपाई देण्याचे निर्देश दिले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या चालू शैक्षणिक वर्षातील प्रवेशाला नाकारलेल्या परवानगीच्या अनुषंगाने यावेळी चर्चा केली गेली. आयोगाने आक्षेप घेतलेल्या त्रुटींवर ताबडतोब तोडगा काढून व्यवस्था उभारण्याचे सांगितले. गोसीखुर्द प्रकल्पात गाळ साचल्याने नेमका धरणातील पाण्याच्या पातळीचा अंदाज घेतला जाऊ शकत नाही. त्यामुळे गाळ काढण्याच्या संदर्भात सर्वेक्षण करून आराखडा तयार करण्यात यावा अशी सूचनाही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना केली. भंडारा शहराच्या बाहेरून जाणाऱ्या बायपास चक्कर रोडवरील समस्या सोडविण्याच्या संदर्भात यावेळी सूचना करण्यात आल्या.
बैठकीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विपुल अंबाडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सोयाम, कार्यकारी अभियंता श्री. थमके, श्री. विनोद बांते, श्री. अनुप ढोके, श्री.मयूर बिसेन, श्री. आशु गोंडाणे, श्री. सचिन कुंभलकर, श्री. सूर्यकांत इलमे आदी उपस्थित होते.