



इंडियन हैडलाइन न्युज/ भंडारा प्रतिनिधी
भंडारा महाराष्ट्र शासन निर्णय दिनांक 27/12/2019 अन्वये राज्यात महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहन लाभ योजना कार्यन्वीत केलेली असून त्याअंतर्गत 29/07/2022 रोजी शासन निर्गमीत करून नियमीत कर्जपरतफेड करणाऱ्या शेतकरी सभासदांकरीता प्रोत्साहनपर लाभ योजना जाहिर करण्यात आली.
महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहन योजनेचा लाभ मिळविण्यासाठी आधार प्रमाणीकरण न केलेल्या राज्यातील 33356 शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणिकरणाची सुविधा दिनांक 12.08.2024 ते 07.09.2024 या कालावधीत उपलब्ध करून देण्यात आली होती. तथापी भंडारा जिल्हयातील अद्याप पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण केलेले नाही. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कार्यालनयीन पत्र क्र. कृषीपत -11/प्रोअयो/आधार प्रमा /2344/2024 दि. 09/09/2024 चे पत्रान्वये सदर शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणीकरणाची सुविधा दि. 18/09/2024 पर्यंत वाढविण्यात आली असल्याचे कळविलेले आहे. तरी उवर्रीत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी आपले सरकार केंद्र / सीएसी केंद्र येथे जावून आपले आधार प्रमाणीकरण लवकरात लवकर करून घ्यावे.
तसेच मय्यत शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांची माहिती योजनेच्या संगणकीय प्रणालीवरून काढुन टाकण्याची सुविधा दि. 09/09/2024 ते दिनांक 17/09/2024 पर्यंत बँकांना दिलेली आहे. तरी मय्यत शेतकऱ्यांच्या वारसांनी त्यांचे कागदपत्रे संबंधीत बँकेत विहीत कालावधीत सादर करावी व आपला वारसान नोंद करून घ्यावे, असे आवाहन शुध्दोधन कांबळे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांनी केले आहे