![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
इंडियन हैडलाइन न्युज/ तुमसर प्रतिनिधी
तुमसर :-लोकशाही असल्याने प्रत्येकच राजकीय पक्षाला तिकिटावर दावा करण्याचा अधिकार आहे. मात्र हे करताना कोणाच्या विरोधात बोलत असू तर सभ्य भाषेचा वापर करायला हवा. भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांकडून आंदोलना दरम्यान आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या संदर्भात करण्यात आलेला एकेरी भाषेचा वापर खपवून घेतला जाणार नाही. महायुतीत तेढ निर्माण होईल असा प्रयत्न कोणीही करू नये असा सल्ला शिवसेना शिंदे गटाचे नितीन सेलोकर जिल्हाध्यक्ष युवा सेंना यांनी पत्रकार परिषदेत दिला.काही दिवसापूर्वी भंडारा विधानसभेची जागा भाजपाला मिळावी म्हणून मागणी करण्यासाठी भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. हे करताना भाजपचे भंडारा तालुकाध्यक्ष आणि काही नेत्यांनी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या विषयी एकेरी शब्दात बोलून त्यांचा अपमान केला. या अनुषंगाने आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी २५ ऑकटोबर ला युवासेनेच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. लोकशाहीत तिकीट मिळावी यासाठी प्रयत्न करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. उमेदवारी मिळण्याच्या शेवटच्या दिवशी पर्यंत तुम्ही प्रयत्न करा. त्याला मुळीच आमचा विरोध नाही. मात्र ही मागणी करताना दुसऱ्यांच्या बाबतीत वक्तव्य करताना शब्दाचा वापर काळजीपूर्वक आणि जपून केला जावा, हे महत्त्वाचे आहे. भाजपच्या तालुकाध्यक्ष आणि एका नेत्याकडून आमदारांबद्दल केलेले वक्तव्य संतापजनक आहे. भाजप सारख्या सुसंस्कृत पक्षातील पदाधिकाऱ्यांना एकेरी भाषेचा वापर शोभत नाही. केवळ एक दोन व्यक्तींमुळे जर युतीमध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता असेल तर याची काळजी पक्षातील वरिष्ठांनी घेण्याची गरज आहे असेही सेलोकर म्हणाले.यावेळी पत्रकार परिषदेत किशोर चौधरी जिल्हा संघटक, उपजिल्हा प्रमुख नरेश उचीबगले (डहरवाल) भोजराज वंजारी संचालक बाजार समिती,राजेश वाघमारे, किशोर यादव, भूषण बुधे, मोहनीश साठवणे, शेखर जांगडे, खेमराज धकाते, संजय डोये, ललित ठाकरे, मारोती समरीत, नितीन राऊत, लक्ष्मीकांत सोनवाने, अनमोल अग्रवाल, वीरेंद्र कठाणे, पंकज वासनिक, आकाश चौधरी, दिगंबर देशभ्रतार उपस्थित होते.