



इंडियन हैडलाइन न्युज/ भंडारा प्रतिनिधी
भंडारा: प्रभू श्रीरामांचे आशीर्वादाने मतदार संघाच्या विकासाचा रथ ओढण्यास सुरुवात केली. त्यांच्याच आशीर्वादाने विकासाची गंगा या भागात प्रवाहित करण्याची ताकद मला मिळाली. जिल्ह्याला संपूर्ण महाराष्ट्रात वेगळे स्थान यामुळे प्राप्त होणार असल्याचे आम. नरेंद्र भोंडेकर म्हणाले. ते येथील खांबतलावात स्थपित करण्यात आलेल्या श्री रामाच्या 51 फुट प्रतिमेच्या अनावरण सोहल्या प्रसंगी बोलत होते.
राममय झालेले वातावरण, आजूबाजूला डोलणारे भगवे आणि उपस्थित प्रत्येकाच्या मुखातून बाहेर पडणारा जय श्रीरामचा जय घोष, अशा अत्यंत प्रसन्न वातावरणात विदर्भातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील पहिल्या वहिल्या प्रभू श्रीरामांच्या 51 फूट उंच प्रतिमेचे अनावरण झाले. भंडाऱ्याचे वेगळेपण जपणाऱ्या या सोहळ्यात रंगत भरली ती प्रसिद्ध गायक हंसराज रघुवंशी यांनी. आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या संकल्पनेतून आणि प्रयत्नातून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून खांब तलावाच्या सौंदर्यकरण प्रकल्पनेची सुरुवात करण्यात आली. अश्यात प्रभू श्रीरामांची 51 फूट उंच अशी मूर्ती या तलावाच्या मध्यभागीत उभरवी असा संकल्प आमदारांनी सोडला होता. त्याची पूर्तता शुक्रवारी झालेल्या नेत्र दीपक सोहळ्याने झाली. तलावाच्या मध्यभागी उभी असलेली प्रभु श्रीरामांची ही मूर्ती भंडारा शहरालाच नव्हे तर जिल्ह्याला वेगळी ओळख देणारी आहे. या प्रभूंच्या मूर्तीचे अनावरण 10 ऑक्टोबर रोजी झाले. यावेळी अनेक मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते. फटाक्यांची आतिषबाजी, जय श्रीराम का जय घोष आणि राममय वातावरणात हा सोहळा पार पडला. विशेष म्हणजे प्रसिद्ध भजन गायक हंसराज रघुवंशी यांच्या भजन संध्येनी सोहळ्याची उंची आणखी वाढविली. हजारो नागरीक आणि रामभक्त या सोहळ्याला उपस्थित होते. अद्भुत असा हा सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा होता.
सोहळ्याला संबोधित करतांना आम. भोंडेकर पुढे म्हणाले की आजचा हा सोहळा माझ्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे. खांबतलावाचाच नव्हे तर संपूर्ण भंडारा विधानसभेचा विकास करण्याचा संलल्प त्यांनी घेतला आहे. ज्यात गोसे जलप्रकल्प असा प्रकल्प असणार की या एक प्रकल्प मुळे 10 हजारावर लोकांना रोजगार मिळणार असल्याचे सांगून परमेश्वराच्या आशीर्वादासोबतच आपलाही खंबीर पाठिंबा पाठीशी असू द्या असे आ. नरेंद्र भोंडेकर यावेळी म्हणाले.
या नेत्रदीप सोहळ्या प्रसंगी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अनिल गायधने, उप जिल्हा प्रमुख अनिल गायधने, लोकसभा समन्वयक संजय कुंभलकर, लोकसभा युवा सेना प्रमुख जॅकी रावलानी, युवासेना जिल्हा प्रमुख नितीन सेलोकर, शहरप्रमुख मनोज सकोरे, राष्ट्रवादी कोंग्रेस चे प्रदेश सचिव धनंजय दलाल, भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, भाजप चे जिल्हा उपाध्यक्ष चैतू उमाळकर, जिल्हा परिषद सदस्य यशवंत सोनकुसरे, कोंग्रेस कामगार जिल्हा अध्यक्ष धनराज सठवणे, महिला कोंग्रेस अध्यक्ष जयश्री बोरकर, उद्योगपति पंकज सारडा, उद्योगपति अभय भागवत, शिवसेना(उद्धव गट) चे तालुका प्रमुख नरेश झळके, युवासेना तालुका प्रमुख हरीश देशमुख, अनुसूचित जाती आघाडी जिल्हा प्रमुख संजय नागदेवे, युवासेना उपजिल्हा प्रमुख कृष्णा ठवकर, विद्यार्थी सेना जिल्हा प्रमुख मयूर लांजेवार, शहर संघटक नितीन धकाते, युवासेना शहर प्रमुख किशोर नेवारे, सरपंच आशू वंजारी आदि उपस्थित होते.