



इंडियन हेडलाईन/ न्यूज भंडारा प्रतिनिधी
भंडारा: रस्ते, नाल्या, समाजभव इ. विकास कामे प्रत्येकच आमदार करतो. मात्र आ.नरेंद्र भोंडेकर यांनी भंडारा-पवनी विधानसभा मतदारसंघात वेगळा करण्याचा प्रयत्न केला. दूरदृष्टीने या क्षेत्रात नव्या आयामांना गवसणी घातली आहे. रोजगार, आरोग्य व जनसुविधा यावर विशेष भर देण्यात आला. यासोबतच पर्यटन, आरोग्य, शिक्षण व शेतीसारख्या विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी केलेले उल्लेखनिय कार्य प्रेरणादायी ठरणार आहे. आ. नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आणि पूर्नत्वास जात असलेल्या २५ महत्वपूर्ण प्रकल्पामुळे या मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलणा र आहे. भंडारा-पवनी मतदारसंघात प्रकल्पांमुळे जवळपास २० हजार तरूणांना रोजगार उपलब्ध होवू शकेल असा आशावाद भंडारा- पवनी विधानसभा क्षेत्राचे तरुण तुर्क आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी दैनिक देशोन्नतीशी मुलाखती दरम्यान बोलताना सांगितले.