



इंडियन हैडलाइन न्युज भंडारा/ प्रतिनिधी
भंडारा: 20 नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या भंडारा विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार असलेल्या आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या प्रचाराचा नारळ आज फोडण्यात आला. भंडारा आणि पवनी तालुक्यातील विविध गावांमध्ये प्रचाराला सुरुवात करण्यात आली.
शिवसेना, भाजपा राष्ट्रवादी, काँग्रेस, रिपाई आणि मित्र पक्षांच्या महायुतीचे उमेदवार म्हणून आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रचंड मोठ्या प्रमाणात नागरिकांचा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आज पासून भंडारा आणि पवनी तालुक्यात प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात झाली आहे. भंडारा येथील मेंढा परिसर तसेच भंडारा ग्रामीण मधील आमगाव, पहेला, कोरंबी, ठाणा तसेच पाहुणे तालुक्यातील अड्याळ, लोणारा, आसगाव आणि पवनी शहरात प्रचार करण्यात आला. घरोघरी जाऊन नागरिकांच्या भेटी घेत त्यांना विकासाला मत देण्याचे आवाहन करण्यात आले.
आमदार नरेंद्र भोंडेकर म्हणजे विकास असे तयार झालेले सूत्र भंडारा विधानसभा मतदारसंघाची रूप पालटण्यासाठी पोषक असल्याची प्रतिक्रिया यावेळी मतदारांकडून आली. या प्रचार अभियानात जिल्हाप्रमुख अनिल गायधने, उपजिल्हाप्रमुख सुरेश धुर्वे, लोकसभा समन्वयक संजय कुंभलकर, शहर प्रमुख मनोज साकुरे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.