![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
इंडियन हैडलाइन न्यूज़/ भंडारा प्रतिनिधि
भंडारा विधानसभा निवडणुकीसाठी 288 मतदारसंघातील सुमारे 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदार संख्येत पुणे जिल्हा आघाडीवर आहे. रत्नागिरी, नंदुरबार, गोंदिया, भंडारा आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांच्या तुलनेत अधिक आहे.
पाच जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या अधिक असल्याचे निवडणुक आयोगाने दिलेल्या माहितीत कळविले आहे. रत्नागिरी, नंदुरबार, गोंदिया, भंडारा आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक आहे.
भंडारा येथे एकूण मतदार 10 लाख 16 हजार 870 असून यामध्ये 4 तृतीयपंथींची नोंद आहे; पुरुष मतदार 5 लाख 6 हजार 974 आणि महिला मतदार 5 लाख 9 हजार 892 आहेत.
विधापसभानिहाय स्त्री -पुरुष मतदारांची संख्या 60-तुमसर मध्ये 155410 पुरुष तर 154316 स्त्री मतदार आहेत. तृतीयपंथी मतदार 1 आहेत. असे एकुण 3 लाख 9727 एकुण मतदार आहेत.
61-भंडारा 187462 पुरुष तर 191202 स्त्री मतदार आहेत. तृतीयपंथी मतदार 3 आहेत असे एकुण 3 लाख 78667 एकुण मतदार आहेत. 62- साकोली 164102 पुरुष तर 164373 स्त्री मतदार आहेत. असे एकुण 3 लाख 28476 एकुण मतदार आहेत.
तीनही मतदार संघातील एकूण 10 लाख 16 हजार 870 मतदार आहेत.