



इंडियन हैडलाइन न्यूज़/ भंडारा प्रतिनिधि
भंडारा पवनी विधानसभा मतदार संघातील तरुण ,तडफदार, दमदार झुंजार सर्व सामान्य जनतेचे लोकप्रिय उमेदवार नरेंद्र पहाडे यांनी निवडणूक रिंगणात उडी घेतली असून त्यांना गावा गावात धान उत्पादक शेतकरी, गोसे प्रकल्प ग्रस्त शेतकरी,शेतमजूर, कामगार, भूमीहीन, सुशिक्षित बेरोजगार, गोरगरीब,शोषित पिडीत सर्व सामान्य जनतेचा मोठ्या प्रमाणात पाठींबा मिळत असल्याने नरेंद्र पहाडे यांच्यात निवडून येण्याची क्षमता निर्माण झाली आहे इतर राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे धाबे
जनतेचे उमेदवार नरेंद्र पहाडे यांनी मागील बऱ्याच वर्षांपासून समाजसेवा
करण्याचा वसा घेतला आहे.समाज सेवा करत असताना त्यांचेशी प्रत्येक समाजाचे नागरिक तसेच सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते जुळलेले आहेत.नरेंद्र पहाडे हे परमार्थ शील , परोपकारी, समर्पित भावनेने समाज सेवा करीत असून ते धान उत्पादक शेतकरी, गोसे
प्रकल्प ग्रस्त शेतकरी, शेतमजूर,कामगार, भूमीहीन, सुशिक्षित बेरोजगार,ज्येष्ठ नागरिक,निराधार,गोरगरिब ,शोषित पिडीत जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी प्राणाची बाजी लावून प्रसंगी रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे सर्व सामान्य जनतेचे लोकप्रिय उमेदवार नरेंद्र पहाडे यांच्या पाठीमागे प्रचार करण्यासाठी नेते,पदाधिकारी,कार्यकर्ते,,मित्र मंडळी व हितचिंतकांचा मोठा लावजमा आणि फौज आहे.
जनतेचे उमेदवार नरेंद्र पहाडे हे भंडारा आणि पवनी तालुक्यातील गावागावात नेते,पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन रोड शो करून मतदार नागरिकांच्या भेटी घेऊन मतदान रुपी आशीर्वाद मागत आहेत.
नरेंद्र पहाडे यांनी निवडणुकी पूर्वी पदाधिकारी व कार्यकर्त्यां समवेत भंडारा आणि पवनी तालुका पिंजून काढला असून त्यांना भंडारा पवनी विधानसभा मतदार संघातील समस्यांचा गाढा अभ्यास आहे.त्यामुळे ह्या समस्या सोविण्यासाठी आणि भंडारा पवनी विधानसभा क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी नरेंद्र पहाडे यांना विधानसभेत पाठविणे काळाची गरज आहे .भंडारा पवनी तालुक्यातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्व सामान्य मतदार हे नरेंद्र पहाडे यांच्या पाठीमागे खंबीर पने उभे असून कार्यकर्ते रात्रंदिवस निःस्वार्थ पने प्रचार कामाला लागले असून प्रचाराला राजकीय रंग चढल्याने जनतेचे उमेदवार नरेंद्र पहाडे यांच्यात निवडून येण्याची क्षमता निर्माण झाली आहे. त्यांच्या उमेदवारीने राजकीय पक्षांच्या उमेदवारांना चांगलाच घाम फुटला असून
नरेंद्र पहाडे यांच्या उमेदवारी आणि प्रचाराने विरोधी उमेदवारांचे धाबे दणाणले असल्याची गावा गावातील मतदारांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. पवनी तालुक्यातील कोदुरली, रेवणी, धानोरी, भोजापुर, गुडेगाव, खातखेडा, निलज,सावरला, शेळी, ढोरप, कान्हाळगाव,सिरसाळा,बेटाळा, येरवा,शिंगोरी,निष्टी,भुयार, मढेगाव, काकेपार, चौफुली नीलज,आमगाव व अन्य गावात प्रचार दौरा करून मतदार बंधू भगिनिंच्या भेटी घेऊन तुतारी चीन्हा समोरील बटण दाबून मतदान रुपी आशीर्वाद द्यावा असे आवाहन नरेंद्र पहाडे यांनी केले.