![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
इंडियन हैडलाइन न्यूज़/ भंडारा प्रतिनिधि
भंडारा: ती समर्थपणे त्यांच्या पाठीशी आहे… साहेब दिवसाची रात्र करीत असताना, त्याही त्यांचे तेवढेच योगदान देत आहेत. मातृशक्तीमध्ये जाऊन साहेबांसाठी प्रचार करणाऱ्या मिस डॉक्टर आज प्रचाराची धुरा एका बाजूने यशस्वीरित्या पेलताना दिसत आहेत. आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या अर्धांगिनी डॉ. अश्विनी यांची त्यांच्या अहोंसाठी सुरू असलेली तळमळ लपून राहिलेली नाही.
विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत प्रचार आता शिगेला पोहचताना दिसत आहे. अशात आता उमेदवारांच्या साथीला त्यांचे कुटुंबीयही मैदानात उतरताना दिसत आहे. विशेष म्हणजे यशस्वी पुरुषांच्या मागे, एक स्त्री असते हा समज सध्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने मैदानात उतरलेल्या मातृशक्ती मुळे दृढ होताना दिसत आहे. सौ. अश्विनी यांनी या. भोंडेकर यांच्या प्रचाराचा नारळ शहराच्या विविध प्रभागात नारळ आपल्या महिला मंडळ सह फोडला. शहरातून पदयात्रा काढत त्यांनी आम. भोंडेकर यांच्या करीत मते मागून विधानसभेचा विकास अविरत सुरू ठेवण्याचे वचन दिले.
भंडारा विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी प्रचारात स्वतःला पूर्णपणे झोकून दिले असताना आता त्यांच्या सौभाग्यवती डॉक्टर असलेल्या अश्विनी यांनीही आमदारांना समर्थपणे साथ देत मैदानात उतरण्यात निर्णय घेतला आहे. प्रचाराची एक बाजू त्यांनी समर्थपणे सांभाळून मातृशक्तीमध्ये जाऊन महायुती शासनाच्या कल्याणकारी योजना सांगीत महिला मतदारांना वास्तविकतेची जाणीव करून देताना दिसत आहेत. ग्रामीण भागात घरोघरी जाऊन भेटी घेत त्यांच्याशी संवाद साधला जात आहे. आवश्यक तिथे छोटेखानी सभा घेऊ भाषण देण्यातही या डॉक्टर महोदया मागे नाहीत. तरुण मतदारांशी संवाद साधताना अनेक सकारात्मक गोष्टींचा खुलासा त्यांच्याकडून केला जात आहे. आज ज्या जोमाने आमदार भोंडेकर यांनी प्रचारात स्वतःला झोकले आहे, त्याच ताकतीने मिसेस डॉक्टर मैदानात उतरल्याने वातावरण सकारात्मक बनले आहे.
रोज सकाळी उठून कुटुंबातील सदस्यांना हवे नको ते पाहून, रुग्णांची काळजी घेऊन घराबाहेर पडणाऱ्या डॉक्टर मॅडमचा प्रचार निवडणुकीत रंगत आणणार हे नक्की. आपल्या श्रीं साठी मैदानात उतरलेल्या सौ पाहून खऱ्या अर्थाने पुरुषांच्या यशात स्त्रियांची भूमिका कधी महत्त्वाची याची जाणीव होते.