![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
इंडियन हैडलाइन न्यूज़/ भंडारा प्रतिनिधि
भंडारा जिल्हयाच्या विकास हे नेहमीच माझे स्वप्न राहिले आहे आणि या स्वप्नाला पुर्ण करण्यासाठी महायुतीचे उमेदवार नरेंद्र भोंडेकर यांच्या पाठीशी उभे राहून विकासाला चालना देण्याचे निर्देश माजी केंद्रीय मंत्री प्रफुलभाई पटेल यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेस कार्यकर्त्यांना दिले. आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी भंडारा पवनी विधानसभा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी कोटयावधी रुपयाचा निधी आणून मतदार संघाच्या विकासाचे अनेक प्रकल्प सुरु केले आहेत. हे प्रकल्प पुर्णत्वास जाण्यासाठी नरेंद्र भोंडेकर यांना विजयी करणे एक मात्र पर्याय आहे. तसेच महाराष्ट्रात महायुतीचे सरकार प्रस्थापित होण्यासाठी नरेद्र भोंडेकर यांच्या पाठीशी महायुतीचा घटक पक्ष म्हणून आपण उभे राहावे. असे प्रफुलभाई पटेल यांनी सांगीतले. पवनी येथील टायगर डेन रिसोर्ट मध्ये आयोजित राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या बैठकीत प्रफुलभाई पटेल बोलत होते. यावेळी माजी राज्य मंत्री नानाभाऊ पंचबुध्दे, आमदार नरेंद्र भोंडेकर, राष्ट्रवादी कॉँग्रेस महासचिव धनजंय दलाल, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सुनिलभाऊ फुंडे, पवनी तालुका अध्यक्ष विजय सावरबांधे, पवनी शहर अध्यक्ष हरीष तलमले, महिला आघाडी, युवक आघाडी व सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते या बैठकीत उपस्थित होते.