![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
इंडियन हैडलाइन न्यूज़/ भंडारा प्रतिनिधि
भंडारा : गेल्या अडीच वर्ष आम. नरेंद्र भोंडेकर यांनी केलेल्या विकास कामामुळे त्याच्या प्रचार आधीच ते घरो घरी पोचल्याचे दिसून येत आहे. अश्यात ते म्हणतात की परीक्षेचा आमचा अभ्यास झालेला आहे. पण जेव्हा परीक्षा येते तेव्हा उजळणी करावीच लागते. सध्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने मतदार संघात उजळणी केली जात आहे. कारण विकास कामे, विविध उपक्रम आणि योजनांच्या माध्यमातून लोकांच्या घराघरापर्यंत आमदार नरेंद्र भोंडेकर आधीच पोहचले आहेत. त्यांना प्रचाराच्या निमित्ताने आता मिळत असलेला प्रतिसाद हॅट्रिक चे संकेत देणारे आहे.
भंडारा विधानसभा मतदारसंघाचे दुसऱ्यांदा प्रतिनिधित्व करताना आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी मतदारसंघात लावलेला विकासाचा धडाका गावागावा पर्यंत पोहोचला आहे. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रचाराला जात असताना याचा प्रत्यय येत आहे. महायुतीचे उमेदवार म्हणून रिंगणात असलेल्या नरेंद्र भोंडेकर यांनी सर्वच प्रचार पद्धतींचा वापर करून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र हा प्रचार त्यांच्यासाठी परीक्षेपूर्वीची उजळणी असल्याचे बोलल्या जाते. कारण मागील कोरोना काळ सोडता उरलेल्या अडीच वर्षात त्यांनी मतदारसंघात खेचून आणलेली विकास कामे आणि त्यानिमित्ताने मुख्यमंत्र्यांनी तीनदा विधानसभा मतदारसंघातील आमदारांना दिलेले पाठबळ यामुळे बरेच काम सोपे झाल्याचे दिसते.
विरोधकांनी कितीही अपप्रचार केला तरीही आज मतदारांना आम. भोंडेकर यांनी केलेल्या कामांची जाणीव झाली आहे आणि ते विरोधकांच्या विकास विरोधी अप प्रचारास बळी पडू शकत नाही. कारण विविध उपक्रम राबवून नागरिकांना त्याचा लाभ मिळवून देण्याच्या प्रयत्नांमुळे आज आमदार नरेंद्र भोंडेकर घराघरापर्यंत पोहोचले आहेत. लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना यासारख्या विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळावा म्हणून आमदार म्हणून त्यांच्याकडून झालेले प्रयत्न प्रचाराचे त्यांचे काम सोपे करणारे आहे. आज मतदारसंघात उभी असलेली त्यांची यंत्रणा आणि गावातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचणारा त्यांचा माणूस यामुळे नरेंद्र भोंडेकर हे नाव घरापर्यंत पोहोचले आहे. सध्या सुरू असलेल्या निवडणूक प्रचाराने निमित्ताने पुन्हा एकदा भोंडेकरांचा कामाचा धडाका आणि नाव घरोघरी चालले आहे. प्रचाराच्या अत्याधुनिक व्यवस्थांसह परंपरागत पद्धतीने सुरू असलेल्या प्रचार आज संपूर्ण मतदारसंघात आघाडीवर दिसत आहे. प्रचारातील ही आघाडी आमदारांना हॅट्रिक साधण्यासाठी पोषक असल्याची चर्चा आहे. सुरू असलेला हा प्रचार म्हणजे परीक्षे पूर्वीची उजळणी असल्याची चर्चाही आता ऐकायला येत आहे. मात्र निवडणुकीत कुणालाही कमी लेखून चालत नसल्याने, स्वतः आमदार नरेंद्र भोंडेकर आणि महायुतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सर्व ताकदीनिशी प्रचाराच्या या रणधुमाळीत स्वतःला झोकुन काम करताना दिसत आहे.